Cricket : साखळी सामन्यात 22 यार्ड्स अकॅडमी व वेंगसरकर अकॅडमी विजयी 

एमपीसी न्यूज – वर्षाखालील व्हेरॉक कप स्पर्धेत आज झालेल्या (Cricket )दोन साखळी सामन्यात 22 यार्ड्स क्रिकेट अकॅडमी व व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी “ब” यांनी विजयी सुरुवात केली आहे.  
22 यार्ड्स क्रिकेट अकॅडमी विरुद्ध ट्रीनिटी क्रिकेट (Cricket)अकॅडमी यांच्यादरम्यान रंगलेल्या सामन्यात 22 यार्ड ने बाजी मारली आहे. या सामन्यात शर्वय भावसार याने 5 गडी बाद करत अष्टपैलू खेळी केली. तो सामनावीर ठरला.

 

 

व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी “ब” विरुद्ध ऑल स्टार क्रिकेट अकॅडमी यांच्यात रंगलेल्या सामन्यात व्हेरॉक वेंगसरकर च्या संघाने आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. या सामन्यात 61 धावांची अर्धशतकी खेळी साकारणारा राजवीर जुनवणे सामनावीराचा मानकरी ठरला. या स्पर्धेला हळूहळू रंगत चढत असून अंतिम फेरीत कोणता सांग पोहोचणार हे पाहण्याची उत्सुकता वाढली आहे.

https://www.youtube.com/watch?v=9qHaE71Wgmc&ab_channel=MPCNews

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.