Cricket News : 12 वर्षाखालील मुलांच्या ‘व्हेरॉक कप’ क्रिकेट स्पर्धेस आजपासून सुरुवात 

एमपीसी न्यूज – पीसीएमसीज व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी (Cricket News) आयोजित 12 वर्षाखालील मुलांच्या ‘व्हेरॉक कप’ क्रिकेट स्पर्धेस थेरगाव येथील मैदानावर आज शानदार सुरुवात झाली असून या स्पर्धेचे उद्घाटन पिंपरी चिंचवड महापालिकेचे कार्यकारी अभियंता हनुमंत शिंदे यांच्या हस्ते झाले.

यावेळी अकादमीचे प्रशिक्षक चंदन गंगावणे, शादाब शेख, भूषण सुर्यवंशी आणि डॉ.विजय पाटील उपस्थित होते. उद्घाटनाच्या दिवशी दोन साखळी सामने खेळविण्यात आले.

Pune : शामकांत पंधरकर यांचे निधन

यामध्ये  विराग क्रिकेट अकॅडमी विरुद्ध व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी ‘अ’ यांनी विजय (Cricket News) मिळवला. या सामन्यात वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीचा अरुणोदय सिंग हा सामनावीर ठरला.

दुसरा सामना आर्यन्स क्रिकेट अकॅडमी विरुद्ध मेव्हरीक्स क्रिकेट अकॅडमी असा सामना रंगला. यामध्ये आर्यन्स क्रिकेट अकॅडमीच्या संघाने बाजी मारली. यामध्ये आर्यन्स क्रिकेट अकॅडमी चा अवनिश ताठे सामनावीर ठरला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.