Cricket: डकवर्थ लुईस नियमानुसार व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी विजयी

एमपीसी न्यूज – व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी विरुद्ध ट्रिनीटी क्रिकेट अकॅडमी(Cricket) यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान पावसाने हजेरी लावली त्यामुळे सामन्यात भक्कम स्थितीत असलेल्या व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी अ संघाला डकवर्थ लुईस नियमानुसार विजयी घोषित करण्यात आले आहे.

थेरगाव येथे सुरू असलेल्या 12 वर्षाखालील मुलांच्या (Cricket)क्रिकेट स्पर्धेत (U12 व्हेरॉक कप 2024) व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी विरुद्ध ट्रिनीटी क्रिकेट अकॅडमी यांच्यात सुरू असलेल्या सामन्या दरम्यान अनपेक्षितपणे आलेल्या पावसामुळे सामना काही काळ सामना थांबवावा लागला.

Shirgaon : मोकळ्या जागेत ठेवलेल्या पाईपला आग

निर्धारित वेळेत पाऊस न थांबल्याने या सामन्यात भक्कम स्थितीत असलेल्या व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीला डकवर्थ लुईस नियमानुसार विजयी घोषित करण्यात आले आहे.


ट्रिनीटी च्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 92 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल व्हेरॉक च्या संघाने 9 षटकांत 37 धावा केल्या. त्यासाठी त्यांनी 2 गडी खर्च केले. डकवर्थ लुईस नियमानुसार या संघाला विजयी करार देण्यात आले.
या सामन्यात साईश बारटक्के हा व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी”अ” चा खेळाडू सामनावीर ठरला.

तर स्टार क्रिकेट अकॅडमी विरुद्ध आर्यन्स क्रिकेट अकॅडमी यांच्यातला सामना पावसामुळे अनिर्णित राहिला.
आयुष गोसावी हा आर्यन्स क्रिकेट अकॅडमी चा खेळाडू सामनावीर ठरला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.