Lonavala : नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला लोणावळा शहरात एकही मद्यपी वाहन चालक आढळला नाही

एमपीसी न्यूज – लोणावळा उपविभागातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये (Lonavala )नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला ड्रंक अँड ड्राईव्हच्या पाच कारवाया करण्यात आल्या. वाहतुकीच्या आणि इतर नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी 510 कारवाया करत एकूण 3 लाख 61 हजार 500 रुपये दंड वसूल करण्यात आला.

लोणावळा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी (Lonavala )सत्यसाई कार्तिक यांनी याबाबत माहिती दिली. वडगाव मावळ पोलिसांनी 30 आणि 31 डिसेंबर रोजी वडगाव ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी तीन कारवाया केल्या. इतर एकूण 63 कारवाया करत 52 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

लोणावळा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वरील कालावधीत ड्रंक अँड ड्राईव्हची एकही कारवाई झाली नाही. एकूण 361 प्रकरणांमध्ये 2 लाख 61 हजार 300 रुपये दंड आकारला गेला.

PCMC : महापालिका अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी विभागीय समितीची बैठक घेण्याची मागणी

लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ड्रंक अँड ड्राईव्हची एकही कारवाई झाली नाही. इतर वाहतूक उल्लंघनाच्या 20 कारवाया करून 10 हजार रुपये दंड आकारण्यात आला.

कामशेत पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन ड्रंक अँड ड्राईव्हची प्रकरणे नोंदविण्यात आली. तसेच एकूण 66 वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबाबत कारवाया करत 37 हजार 700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.