PCMC : महापालिका अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी विभागीय समितीची बैठक घेण्याची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनातील (PCMC)सहशहर अभियंता, कार्यकारी अभियंता यांची विभागीय पदोन्नती समितीची (डीपीसी) बैठक घ्यावी व पुढील कार्यवाही करावी, अशी सूचना भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना (PCMC)निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य अभियंता यांची विभागीय पदोन्नती समितीची बैठक (डीपीसी) झाली होती.

Pune : पीएमआरडीएच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतले तणावमुक्त जीवनाचे धडे

त्यानंतर सहशहर अभियंता आणि कार्यकारी अभियंता, उपाभियंता यांची डीपीसी होणे अपेक्षीत होते. मात्र, झालेली नाही. तसेच, संबंधितांना त्या-त्या विभागाचा चार्जही दिलेला नाही.

महापालिका सेवेतील काही कार्यकारी अभियंता व उपअभियंता सेवा निवृत्त झाले आहेत. त्यामुळे सह शहर अभियंता व कार्यकारी अभियंता यांच्या जागा रिक्त आहेत. कामाची व्याप्ती व कामकाजाच्या सोईच्या दृष्टीने सदरच्या जागा भरणे आवश्यक आहे. सदर अधिकाऱ्यांची डीपीसी आणि पुढील कार्यवाही करावी, अशी सूचनाही आमदार लांडगे यांनी केली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.