Pune : पीएमआरडीएच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतले तणावमुक्त जीवनाचे धडे

एमपीसी न्यूज – पीएमआरडीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी “मनाची अमर्याद शक्ती व तणाव मुक्ती” या विषयावरची (Pune) कार्यशाळा प्रख्यात माईंड पॉवर ट्रेनर डॉ दत्ता कोहिंकर यांनी घेतली. त्यांच्या विशिष्ट शैलीत प्रबोधन प्रयोगाद्वारे प्रभावी मार्गदर्शन करत मनावरचा ताण हलका करुन तणाव मुक्त राहून उत्कृष्ट काम कसे करता येईल असे आपल्या विशिष्ट शैलीत प्रबोधन प्रयोगाद्वारे प्रभावी मार्गदर्शन केले.

यावेळी कार्यशाळेला सहआयुक्त सुनील पांढरे, उपायुक्त शिल्पा करमरकर, उपजिल्हाधिकारी रामदास जगताप , उपायुक्त प्रवीण ठाकरे,उपायुक्त मनिषा कुंभार, जिल्हा अधीक्षक भुमी लेख आशा जाधव, वरिष्ठ पो. निरीक्षक महेश सरतापे ,तहसीलदार, प्रांत, पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांबरोबर ज्येष्ठ सामजिक कार्यकर्ते सुधीरकुमार अग्रवाल आदी उपस्थित होते. महानगर आयुक्त महिवाल व अतिरीक्त आयुक्त सिंगला तसेच सहआयुक्त सुनील पांढरे यांच्या प्रेरणेने ही कार्यशाळा घेण्यात आली.

याप्रसंगी बोलताना माइंड पॉवर ट्रेनर डॉ. दत्ता कोहिनकर यांनी मन म्हणजे काय? त्याचे कार्य कसे चालते? मनाला तणावमुक्त कसे ठेवायचे? त्याचप्रमाणे इप्सित गोल कसे साध्य करायचे? प्रोजेक्ट कसे पूर्ण करायचे? त्याचप्रमाणे मनाला सबल कसे करायचे, त्याचप्रमाणे आकर्षणाचा सिद्धांत व शारीरिक सबलता याबाबत सोदाहरण मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी मनःशक्तीची काही प्रात्यक्षिकेही करून दाखवली. जीवन जगताना वेगवेगळ्या संकटांना तोंड कसे द्यायचे व आनंदी कसे राहायचे याबाबत त्यांनी खूप छान पद्धती शिकवल्या व विपश्यना ध्यान धारणा दहा दिवसाचे शिबिर करण्याचे आवाहन केले.

PCMC : सिटी सेंटरसाठी अधिकारी सिंगापूर दौ-यावर

याप्रसंगी कार्यशाळेचे उद्घाटन करताना सह आयुक्त सुनील पांढरे यांनी बदलत्या काळातील मनावर पडणारा ताण व त्याचे परिणाम पहाता अशी कार्यशाळा सर्व शासकीय कार्यालयात घेण्याची आवश्यकता विशद केली. यावेळी उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनीही कार्यक्रमाचे महत्व (Pune) व गरज अधोरेखीत केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशासन विभागाने विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिल्पा करमरकर यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.