PCMC : सिटी सेंटरसाठी अधिकारी सिंगापूर दौ-यावर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने (PCMC) चिंचवड येथे नियोजित सिटी सेंटर उभारण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेचे अधिकारी सिंगापूर दौऱ्यावर रवाना झाले आहेत. महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांच्यासह पालिकेच्या 4 व राज्य शासनाच्या नगरविकास विभागाच्या एका अधिका-यांत समावेश आहे.

मुंबई, नवी दिल्ली आणि परदेशातील व्यापारी संकुलाच्या धर्तीवर महापालिकेच्या वतीने पुणे- मुंबई जुन्या महामार्गावरील चिंचवड येथे सिटी सेंटर हे व्यापारी संकुल बांधण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेने नेमलेल्या सल्लागारी संस्थेमार्फत दोन परदेश दौ-याचे आयोजन करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, तत्कालीन अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, शहर अभियंता मकरंद निकम, कार्यकारी अभियंता शिरीष पोरेड्डी यांनी दुबईचा दौरा केला होता. या दौऱ्यानंतर अधिकाऱ्यांच्या दुसरा दौरा सिंगापूर येथे आहे.

Talegaon Dabhade : पुस्तक, व्याख्यान आणि संगतीमुळे माणसाचे जीवन घडते – यजुर्वेंद्र महाजन

त्यात अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, स्थापत्य प्रकल्प विभागाचे सहशहर अभियंता प्रमोद ओंबासे, उद्यान विभागाचे उपायुक्त रविकिरण घोडके, बांधकाम परवानगी विभागाचे उपअभियंता विजय भोजने यांचा समावेश आहे. शासनाच्या (PCMC) नगरविकास विभागाचे कक्ष अधिकारी शिवाजी चव्हाण यांचाही या दौऱ्यात समावेश आहे. सिंगापूर येथे विकसित करण्यात आलेल्या सिटी सेंटरच्या मॉडेलचा अभ्यास, त्याची सविस्तर माहिती घेण्यासाठी हा दौरा असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.