Pune : काँग्रेस पक्ष पुण्याची जागा जिंकणार म्हणजे जिंकणारच : नाना पटोले

एमपीसी न्यूज – काँग्रेस सकारात्मकतेने निवडणुकीला सामोरे (Pune)जाणार आहेत. यावेळी काँग्रेस पक्ष पुण्याची जागा जिंकणार म्हणजे जिंकणार, कसब्यात रविंद्र धंगेकर जिंकणार असल्याचे सांगितले होते. त्यावेळी काही पत्रकार हासत होते.

धंगेकर यांना दिल्लीत काही यावे लागले नाही. मेरिटच्या आधारे पुण्यातील उमेदवार ठरवून घरपोच तिकीट देणार आहे. आज हजारो तरुणांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आमच्याकडे लोकशाही आहे. हुकूमशाही नाही, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Pune) आज काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, जेष्ठ नेते उल्हास पवार, आमदार रविंद्र धंगेकर, विषवजीत कदम, माजी आमदार मोहन जोशी, अनंतराव गाडगीळ, प्रदेश सरचिटणीस ऍड. अभय छाजेड, माजी महापौर कमाल व्यवहारे, कामगार नेते सुनील शिंदे उपस्थित होते.

Wakad : टास्कच्या बहाण्याने 20 लाखांची फसवणूक

नाना पटोले म्हणाले, महाआघाडीचा लोकसभा निवडणुकीचा फारमुला तयार आहे. राज्यात 50 जागा भाजप सांगणार आहेत. उद्याची बैठक राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेसाठी आहे. महाराष्ट्र राज्यात आघाडी सरकारची बोलणी चांगल्या प्रकारे आहे. राम मंदिराचे बांधकाम अपुरे असल्याचे शंकराचार्यांनी सांगितले आहे.

केवळ निवडणुकीसाठी या मंदिराचा उपयोग होत आहे. मी पण हिंदू आहे. राम मंदिर छोटे दाखवून मोदी यांना मोठे दाखविण्याचा हा प्रयत्न आहे. 22 तारखेला काहीही उपयोग नाही. राम मंदिराचा राजकारणासाठी वापर होतोय. पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार लवकरच ठरविणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे ऍड. प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीत समावेश करण्यासाठी काँग्रेसची भूमिका आहे.

उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांच्या सोबत आंबेडकर यांचे बोलणे झाले. पवार यांच्याशी बोलणे झाले आहे. मेरिटच्या आधारे जागा वाटपाचा फारमुला तयार आहे. आम्ही तिघांची भूमिका स्पष्ट आहे. उध्दव ठाकरे यांनी जागेसंदर्भात काहीही बोलणे केले नाही. संघटनेची पुण्यात बैठक होणार आहे. काँग्रेसने 60 वार्षात लोकांना सांभाळले. मोदी सरकारने 10 वर्षांत काय केले? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आज हजारो तरुणांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आमच्याकडे लोकशाही आहे. हुकूमशाही नाही.

पटोले म्हणाले, आगामी वर्ष निवडणुकीचे वर्ष आहे. महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशभरात मालवाहतूक दारांचा संप सुरू आहे. त्याचा परिणाम सर्वसामान्यांना होत आहे. देशात तानाशाही सुरू आहे. आता जो कायदा केला आहे, त्यामध्ये 7 लाख दंड, आणि 10 वर्षांची शिक्षा आहे.

हा कायदा करण्यामागचा हेतू काय आहे, लोकांनी वाहने वापरू नये, का लोकांनी पायीच चालावे, ही तर सरकारची मानसिकता आहे का? समृद्ध माहामार्गावर किती तरी बळी जात आहेत. टाटा गरम होऊन त्यामध्ये अनेक नागरिकांचा बळी जातोय. भाजप सरकारला याचे काहीही देणेघेणे नाही. आवश्यक ते केमिकल या समृद्धी महामार्गावर वापरण्यात आले नाही.

पेपर फुटीमुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. महात्मा फुले यांच्या वाडयात भेट दिली असता पीएचडी विध्यार्थी रडत होते. महराष्ट्रात रोज शेतकरी आत्महत्या करतायेत. शेतकरी विरोधातील हे सरकार आहे. राजस्थानमध्ये 450 रुपये ला गॅस केला. देशातील दुसऱ्या क्रमांकचे राज्यात गॅस माहाग का? हजारो कोट्यवधी रुपये कमविण्यासाठी अदानीला फायदा करीत आहे.

मणिपूर ते मुंबई न्याय यात्रा राहुल गांधी काढणार आहेत. गेल्या 10 वर्षांत एकही काम मोदी सरकारने केले नाही. निवडणूक आयोगाची पारदर्शकता राहणार की नाही?

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.