Wakad : टास्कच्या बहाण्याने 20 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – टास्कच्या बहाण्याने एका व्यक्तीची 20 लाख 32 हजार रुपयांची फसवणूक (Wakad) करण्यात आली. हा प्रकार 28 मार्च ते 3 जानेवारी या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून घडला.

अविनाश क्रिश्ननकुट्टी कुन्नूबरम (वय 40, रा. थेरगाव. मूळ रा. केरळ) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार @ammy7722 हा टेलिग्राम ग्रुप धारक, mtxcoin.com ही खोटी वेबसाईट बनवणारा व्यक्ती, येस बँक खाते 04616300003760, 019063300012177 धारक आणि आयसीआयसीआय बँक खाते 613505027348 धारक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri : रयत विद्यार्थी विचार मंच च्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीस व्हाटसअप वरून संपर्क केला. त्यांना जॉब संदर्भात (Wakad) मेसेज करून एका टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन करुन घेतले. त्यानंतर वेळोवेळी प्रीपेड टास्क देऊन त्यांच्याकडून वेगवेगळ्या बँक खात्यावर एकूण 20 लाख 32 हजार 787 रुपये घेतले. त्यानंतर त्यांना कोणताही मोबदला अथवा त्यांची रक्कम परत न करता त्यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटल आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.