Pimpri : रयत विद्यार्थी विचार मंच च्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त (Pimpri ) रयत विद्यार्थी विचार मंच च्या वतीने सावित्राबाई फुले स्मारक,पिंपरी या ठिकाणी अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेच्या पिंपरी चिंचवड शहराच्या उपाध्यक्ष भाग्यश्री आखाडे व सदस्य वैष्णवी डावरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.

यावेळी संस्थेचे प्रदेश महासचिव संतोष शिंदे यांनी (Pimpri )जयंतीच्या शुभेच्छा देताना असे मत व्यक्त केले की, आजच्या महिलांनी सावित्रीबाईंचा आदर्श घेऊन शिक्षणाच्या जोरावर मोठ्या मोठ्या पदावर जाऊन केवळ स्वतःपुरता विचार न करता त्या पदाचा वापर या शोषित पीडित समाजासाठी केला पाहिजे तीच खरी सावित्रीमाईला आदरांजली ठरेल.

Pimpri : कष्टकरी महिलांकडून सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

यावेळी संस्थेचे प्रदेश महासचिव संतोष शिंदे,पश्चिम महाराष्ट्र सचिव समाधान गायकवाड,पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अभिषेक चक्रनारायण,उपाध्यक्ष भाग्यश्री आखाडे,सदस्य वैष्णवी डावरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.