Pune : पुण्यासह राज्यातील 16 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट, पुढील  4 दिवस पावसाची शक्यता

एमपीसी न्यूज –  हवामान विभागाने पुढील चार दिवस ( Pune ) राज्यभरात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे. यामध्ये पुण्यासह 16 जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.
मध्य महाराष्ट्रावर वाऱ्याची चक्रिय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अरबी समुद्रावरून बाष्पयुक्त वारे राज्याकडे येत आहे. उत्तरेकडून येणारे उष्ण वारे आणि स्थानिक तापमान वाढीमुळे जास्त उंचीचे ढग निर्माण होत आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात पाऊस कमी पडला तरीही वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुणे, सातारा,सांगली,सोलापूर,धाराशिव,बुलढाणा,नांदेड,हिंगोली,अकोला, अमरावती, नागपूर ,लातूर, वर्धा,वाशिम, यवतमाळ,चंद्रपूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे.
तर शुक्रवारी विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण-मध्य महाराष्ट्रात. शनिवारी पूर्व विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र. रविवारी किनारपट्टी वगळता सर्व महाराष्ट्र आणि सोमवारी, 13 मे रोजी विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण-मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट दिला आहे. पुणे, मावळ, शिरूर, नगर, शिर्डीत पाऊस पडण्याचा अंदाज आहे. राज्याच्या अन्य भागांतही पावसाची शक्यता व्यक्त ( Pune ) केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.