Pimpri : कष्टकरी महिलांकडून सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त (Pimpri) कष्टकरी महिलांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

शिल्पा जानराव, छाया मोरे, केसर नादीर, द्रौपदी लोखंडे, कांता कांबळे, सोनाली कांबळे, वंदना मोरे,शकुंतला कांबळे,सविता सोनथे, छाया उघडे, सुरेख जाधव, संगीता लांडगे, राधा रसाळ, सविता रेवळ, हिना पठाण उपस्थित होत्या.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतिराव फुले यांनी सन 1873 साली सत्यशोधक सामाजाची स्थापना केली. याचा आदर्श आजही समाजापुढे आहे. भारतीय स्त्रीला वर्षानुवर्षं शिक्षणाची दारे बंद होती.सामाजिक वास्तवाचे कवच भेदून अचुक वेध घेत मुलींची पहिली शाळा काढून स्त्री सन्मान करत त्यांना मुख्य प्रावाहात आणले, असे कष्टकरी संघर्ष महासंघाच्या महिला अध्यक्षा माधुरी जलमुलवार म्हणाल्या.

Pune : भारतात रंगीत टीव्ही प्रसारणात महत्वाची भूमिका बजावणारे मधुकर यादव थोते यांचे निधन

सावित्रीबाई फुले यांना अनेकदा चिखलफेक झाली, मात्र या पवित्र शिक्षण कामात त्यांनी बाधा येऊ दिली नाही. अशिक्षीतपणामुळे असंघटीत कामगार क्षेत्रात आलेल्या (Pimpri) महिला सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेउन आज आपल्या क्षेत्रात काम करत आहेत.

कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे प्रशिक्षण देऊन विधवा ,घरेलू कामगार, मजुर महिला, फेरीवाला यांना आर्थिक सामजिक, व व्यावसायिक दृष्ट्या साक्षर करुन सक्षम करण्यासाठी सुरुवात झाली आहे. याचा लाभ जास्तीत-जास्त महिला पर्यंत पोहोचवण्यासाठी महासंघाचे पदाधिकारी प्रयत्न करतील असा विश्वास जलमुलवार यानी व्यक्त केला. प्रास्ताविक नम्रता जाधव यांनी केले तर आभार अर्चना कांबळे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.