Pune : भारतात रंगीत टीव्ही प्रसारणात महत्वाची भूमिका बजावणारे मधुकर यादव थोते यांचे निधन

एमपीसी न्यूज – भारतात रंगीत टीव्ही प्रसारणात अतिशय महत्त्वाची भूमिका (Pune) बजावणारे पुण्यातील मधुकर यादव थोते (वय 93) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले.

टीव्ही प्रसारण कृष्णधवल (ब्लॅक अँड व्हाईट)मध्ये असताना 1980 साली दिल्ली दूरदर्शनचे प्रभारी अभियंता म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. त्यानंतर त्यांनी कलर ट्रान्समिशन तंत्रज्ञानावर आपले काम सुरू केले.2 वर्षांच्या संशोधन, प्रयोग आणि चाचण्यांनंतर भारतामध्ये 1982 साली थोते यांच्या सक्षम तांत्रिक नेतृत्वाखाली रंगीत टीव्ही प्रसारणाचे युग सुरू झाले. यावेळी 15 ऑगस्ट 1982 रोजी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या राष्ट्राला उद्देशून केलेले पहिले अधिकृत रंगीत प्रसारण आपणा सर्वांना ज्ञात आहेच.

या प्रमुख योगदानाव्यतिरिक्त मधुकर थोते यांनी देशभरात आकाशवाणी आणि दूरदर्शनसाठी प्रसारण केंद्रे उभारण्यात मोलाचा वाटा उचलला. 1976 ते 1978 सालादरम्यान फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) मध्ये संचालक म्हणून (Pune) त्यांनी काम पाहिले. 1979 मध्ये आफ्रिकेतील दूरसंचार संस्थेच्या स्थापनेसाठी संयुक्त राष्ट्र संघाच्यावतीने प्रकल्प संचालक म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली होती.

Thergaon : नोकरीचे आमिष दाखवून तरुणाची तब्बल सात लाख रुपयांची फसवणूक

1988 साली दूरदर्शन आणि आकाशवाणीचे मुख्य अभियंता म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर थोते यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 22 वर्षे एज्युकेशनल मल्टीमिडीया रिसर्च सेंटर (ईएमआरसी) आणि मिडीया व कम्युनिकेशन स्टडीज विभागाचे संचालक म्हणून काम पाहिले. ते इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियंता संस्थेच्या पुणे विभागाचे (आयईटीई)अध्यक्ष देखील होते. त्यांच्या मागे बायको, दोन मुलगे, एक मुलगी, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.