Dehuroad : मोकळ्या जागेत बांधलेला एक लाख रुपयांचा घोडा चोरीला

एमपीसी न्यूज – देहुरोड येथे मोकळ्या जागेत बांधलेला (Dehuroad)एक लाख रुपयांचा घोडा चोरीला गेला आहे. ही चोरी 31 डिसेबर 2023 ते 1 जानेवारी या कालावधीत देहूरोड येथील बुद्धविहार जवळ घडली.

काळु साधू मदने (वय 22 रा. देहुरोड) यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Chinchwad :10 वर्षीय आर्या सोनार ची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद;एका मिनिटात काढले 50 फिंगर पुशअप्स

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मेंढपाळ (Dehuroad)असून त्यांनी त्यांचा घोडा चरण्यासाठी बुद्ध विहार जवळील मोकळ्या जागेत बांधला होता. या दरम्यान चोराने घोडा चोरून नेला आहे. यावरून देहुरोड पोलीस ठाण्यात 1 लाख रुपयांचा घोडा चोरल्याची तक्रार दाखल केली असून पोलीस चोराचा शोध घेत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.