Chinchwad :10 वर्षीय आर्या सोनार ची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद;एका मिनिटात काढले 50 फिंगर पुशअप्स

एमपीसी न्यूज – शोतोकन कराटे डू असोसिएशनची (Chinchwad)विद्यार्थीनी आर्या लीना महेश सोनार या 10वर्षीय विद्यार्थिनीने सुमारे एका मिनिटात 50फिंगर पुश अप्स करत इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे.

आर्याने हा विक्रम एम्पायर स्क्वेर सोसायटी चिंचवड येथे केला आहे.

Bhosari : अल्पवयीन मुलाला भेटायला बोलावून केली बेदम मारहाण

फिंगर पुशअप्स ही एक बोटामधील ताकद वाढविण्याची (Chinchwad)योग कला आहे. कराटे खेळात आपली शरीराची ताकद निर्माण करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. यामध्ये दोन्ही हाताच्या बोटांवर शरीराचे संतुलन करून बोटांवर सर्व शरीराचा भार देऊन पुशअप्स काढले जातात.

फिंगर पुशअप्स प्रकारात कमी कमी वेळात जास्त पुश अप्स करण्याचा विक्रम आर्याने केला आहे.
याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे. *Maximum finger pushups performed By a Girl Child in One minutes* याबाबत आर्याला इंडिया बुक ऑफ रेकॉर्डच्या वतीने मेडल, प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

आर्या मागील मार्च महिन्यापासून फिंगर पुशअप्सचा सराव करत (Chinchwad) होती. सरावाच्या वेळी तिने चांगले सातत्य राखले. त्यामुळे आर्याचा या फिंगर पुशअप्समधील पुशअप्स काढणे हळूहळू वाढले. सुरुवातीला २० तर काही दिवसांनी तिने ३८ चा पल्ला गाठला. त्यानंतर तिने १ मिनिटात ५० पुशअप्स असा विक्रमी वेळ नोंद केला असल्याचे आर्याचे प्रशिक्षक सागर सोनवणे यांनी सांगितले.

आर्याच्या यशामागे युनिव्हर्सल शोतोकन कराटे डू असोसिएशनचे संस्थापक संजय पवार, अंकुश तिकोने, आरती मल्ला, प्रफुल प्रधान, सागर सोनवणे या प्रशिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आहे. तसेच यामध्ये वडील महेश आणि आई लीना यांचा मोलाचा वाटा आहे. आर्याने मिळवलेल्या यशाबद्दल तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.