Talegaon Dabhade : पुस्तक, व्याख्यान आणि संगतीमुळे माणसाचे जीवन घडते – यजुर्वेंद्र महाजन

एमपीसी न्यूज – पुस्तक, व्याख्यान आणि संगत यामुळे माणसाचे (Talegaon Dabhade )जीवन घडते.चांगली पुस्तके वाचणे, व्याख्यान ऐकणे आणि चांगल्या माणसांच्या-मित्रांच्या संगतीत राहणे फार गरजेचे आहे.

आपल्याला प्रेरणा मिळते. आपले ध्येय साध्य करण्यासाठी या तीन गोष्टींना महत्त्व आहे, असे प्रतिपादन जळगावच्या दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन यांनी केले.

इंद्रायणी विद्या मंदिर संस्था आयोजित मावळभूषण कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. ते व्याख्यानमालेत ‘स्वप्न बघा’ या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे होते.

तर व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष डाॅ. दीपक शहा, (Talegaon Dabhade )कार्यवाह चंद्रकांत शेटे, खजिनदार शैलेश शहा,सदस्य गणेश खांडगे, निरुपा कानिटकर, संजय साने, डाॅ. अनंत परांजपे, भास्करराव म्हाळसकर,राजश्री म्हस्के, सदस्य विलास काळोखे,परेश पारेख, रणजीत काकडे, युवराज काकडे, प्राचार्य डॉ.संभाजी मलघे, डी फार्मसीचे प्राचार्य जी एस शिंदे आदी उपस्थित होते.

Pimpri : रयत विद्यार्थी विचार मंच च्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाबद्दल इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेकडून दिला जाणारा पुरस्कार कलापिनी संस्थेचे अध्यक्ष डाॅ. अनंत परांजपे तसेच समाजरत्न पुरस्कार भाजपाचे प्रभारी व मावळ विचार मंचचे संस्थापक भास्करराव म्हाळसकर यांना देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

श्री महाजन म्हणाले, प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनात मोठी स्वप्ने पाहीली पाहिजेत, तसेच ती पूर्ण करण्यासाठी आत्मविश्वासपूर्ण जबरदस्त प्रयत्न केले पाहिजेत. यश हे त्यामुळे मिळेलच. यावेळी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना श्री महाजन म्हणाले की, प्रत्येकाने आपला मित्र काळजीपूर्वक निवडला पाहिजे.

चांगल्या मित्रांच्या संगतीत आयुष्यात चागंली दिशा मिळते. तसेच यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम घेतले पाहिजे. एन्जॉय करा, जीवनात एन्जॉय लोणच्याप्रमाणे असावे. तुम्ही स्वतः जे समजाल, जसा विचार कराल तसेच घडेल आणि तुम्ही तेच बनाल, असेही महाजन म्हणाले.

 

व्याख्यानमालेचे प्रास्ताविक शैलेश शहा यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डाॅ. दीपक शहा यांनी केला. निरुपा कानिटकर यांनी आभार मानले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.