Talwade : ज्येष्ठ नागरिकाच्या तोंडाला मिरची पावडर फासून 27 लाखांची चोरी करणाऱ्या पाच आरोपींना अटक

एमपीसी न्यूज- तळवडे येथे एका 68 वर्षीय ज्येष्ठ (Talwade)नागरिकाच्या तोंडाला मिरची पावडर चोळून तब्बल 27 लाख रुपये चोरून नेणाऱ्या पाच आरोपींना गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. ही घटना 14 नोव्हेंबर रोजी रात्री तळवडे चिखली येथे घडली होती.

या प्रकरणी प्रकाश भिकचंद लोढा (वय 68) याने निगडी पोलीस ठाणे तक्रार दिली होती विशाल साहेबराव जगताप (वय 25 रा चिखली ) लालबाबू बाजीलाल जयस्वाल (वय 28 उत्तर प्रदेश) जावेद अकबर काझी (वय 50 रा देहूरोड) अभिषेक दयानंद बोडके (वय 19 रा.चिखली) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोढा (Talwade)हे त्यांचे मनी ट्रान्स्फर चे 27 लाख 25 हजार आठशे रुपये रोख घेऊन स्कूटरवरून घरी जात होते. यावेळी हत्ती चौक ते एलआयसी कॉर्नर दरम्यान यमुनानगर येथे आरोपींनी त्यांच्या स्कूटरला गाडीने धक्का दिला. यावेळी त्यांना मिरची पावडर तोंडावर टाकून त्यांची पैशांची बॅग हिसकावून नेली होती.

Mp Shrirang Barne : कर्जतमधील ओव्हर ब्रिजचे काम पूर्ण, सिंहगड एक्सप्रेसमध्ये महिलांसाठी वेगळा डबा

घटनेचे गांभीर्य ओळखून पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा, खंडणी व दरोडा विरोधी पथक युनिट एक दोन तीन चार यांनी वेगवेगळे पथके तयार करून तपास सुरू केला यावेळी तपासी पथकाला बातमीदारामार्फत गुन्ह्यातील दोन आरोपी निष्पन्न करता आले. त्या अनुषंगाने तपास करत पोलिसांनी विशाल जगताप याला पुणे नाशिक महामार्गावरून ताब्यात घेतले. यावेळी तपासात त्याच्याकडून संबंधित गुन्ह्यातील 8 लाख 1हजार 500 रुपये रक्कम हस्तगत करता आली त्यानंतर विशाल कडे तपास केला असता त्याने लालबाबू जावेद अभिषेक यांच्या बद्दल माहिती दिली व पोलिसांनी त्यांना देखील वेगवेगळ्या ठिकाणावरून ताब्यात घेतले.

या तपासात पुढे आणखी दोन आरोपी निष्पन्न झाले त्यातील धीरेंद्र आसवानी सिंग (वय 38 रा चिखली) हा मनोज जैस्वाल यांच्या संपर्कात असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्या दिशेने तपास फिरवून धीरेंद्रला ताब्यात घेतले. यावेळी मनोज याच्या सांगण्यावरून आरोपींनी ही रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यात भरली होती तसेच त्यांनी क्रेडिट कार्डचे लोन व सोसायटीचे लोन याच पैशातून भरले होते. तसेच मनोज ने आरोपींची विमानाची तिकिटे काढून काही सोन्याचे दागिने व मोबाईल देखील याच पैशातून खरेदी केला होता. यावेळी पोलिसांनी धीरेंद्र सिंग व मनोज यांचे बँक खाते गोठवून 27 लाख पैकी आतापर्यंत एकूण 11 लाख 35 हजार 400 रुपये एवढे पैसे परत मिळवले आहेत.

पोलीस तपासात आरोपींनी मनोज याच्या साथीने फिर्यादी यांच्याकडील कामगार मोहन वैद्य याला देखील दोन वेळा लुटण्याचा कट रचला होता परंतु तो त्यांचा कट व यशस्वी ठरला होता यावरून आरोपींनी विरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड संतोष पाटील साहेब पोलीस निरीक्षक अमरीश देशमुख पोलीस उपनिरीक्षक इमरान शेख भरत गोसावी गणेश माने तसेच दरोडा विरोधी पथक युनिट एक दोन तीन चार व खंडणी विरोधी पथक यांनी केली आहे.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.