PMP : सीएनजी व इलेक्ट्रीक अशा पीएमपीमध्ये एकूण 400 नव्या बस होणार दाखल

एमपीसी न्यूज – ‘पीएमपी’च्या संचालक मंडळाच्या बैठकीत ( PMP)  स्वमालकीच्या 100 ‘सीएनजी’ बस खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. त्यानंतर 200 सीएनजी बस भाडेतत्वावर व 100 इलेक्ट्रिक बस भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय झाला. ‘पीएमपी’त एकूण 400 नव्या बस दाखल होणार आहेत. यामुळे ‘पीएमपी’ची सेवा सुधारण्यास मदत होणार आहे.

Cricket : राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक पदी कायम; बीसीसीआयने केली अधिकृत घोषणा

‘पीएमपी’च्या ताफ्यात आता नव्याने  100 सीएनजी बस घेत आहे. शिवाय 300 नवीन बस या ( PMP) भाडेतत्वावर घेत आहे. या आठवड्यात निविदा प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. यात 300 ‘सीएनजी’ व 100 इलेक्ट्रिक बसचा समावेश आहे. ‘सीएनजी’ बस दाखल होण्यास किमान तीन महिन्यांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रिक बसला मात्र उशीर लागणार आहे. या 12 मीटर लांबीच्या बस असतील.

सध्या प्रवासी संख्येच्या तुलनेत बसची संख्या कमी आहे. त्यामुळे बसची उपलब्धता वाढविणे आता अपरिहार्य झाले आहे.

‘पीएमपी’ प्रशासनाने ‘सीएनजी’वर धावणाऱ्या बसची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ‘पीएमपी’च्या स्वमालकीच्या 981 बस आहेत, तर सात ठेकेदारांच्या मिळून 1098 बस आहेत. नव्याने दाखल होणाऱ्या एकूण 400 बस पैकी 300 बस ‘सीएनजी’ आहेत, तर 100 इलेक्ट्रिक आहेत. ‘सीएनजी’वर होणारा खर्च हा इलेक्ट्रिक गाड्यांच्या तुलनेत कमी ( PMP) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.