Pune : उद्या लक्ष्मी रस्त्यावरील वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज – लक्ष्मी रस्त्यावर उंबऱ्या गणपती चौक ते गरुड गणपती चौकादरम्यान ( Pune) सोमवारी वॉकिंग प्लाझा होणार आहे. त्यामुळे पीएमपीच्या वाहतुकीत सकाळी 10  ते सायंकाळी 7 दरम्यान बदल होणार आहेत. अटल, पुण्यदशम मार्ग क्रमांक 7 व 9 हे बंद राहतील.  तसेच या रस्त्यावरील उंबऱ्या गणपती चौकापासून स्वारगेट आणि डेक्कनसाठी दर 30 मिनिटांनी बसचे नियोजन केले आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून विविध प्रकारे नियोजन करण्यात आले आहे.

लक्ष्मी रस्त्यावर उंबऱ्या गणपती चौक ते गरुड गणपती चौकादरम्यान सोमवारी वॉकिंग प्लाझा होणार आहे. त्यामुळे पीएमपीच्या वाहतुकीत सकाळी 10 ते सायंकाळी 7 दरम्यान बदल होणार आहेत. अटल, पुण्यदशम मार्ग क्रमांक 7  व 9हे बंद राहतील. तसेच मार्ग क्रमांक 55 ,58, 59 हे बस मार्ग शनिपारकडे येताना कुमठेकर रस्तामार्गे नियमित मार्गाने व शनिपारकडून जाताना अप्पा बळवंत चौक, नारायण पेठ, अलका टॉकीज चौकातून पुढे नियमित मार्गाने जातील.

Central Railway : रेल्वेच्या पुणे ते लोणावळा स्थानकांदरम्यान आज मेगाब्लॉक

बसमार्ग क्रमांक 81,144, 144 अ, 144 क व 283 या मार्गावरील बसेस पुणे स्टेशनकडे जाताना नियमित मार्गाने व पुणे स्टेशनकडून येताना मनपामार्गे संचलनात राहतील. बसमार्ग क्रमांक 174 या मार्गावरील बसेस पुणे स्टेशनकडून एनडीएकडे जाताना सिटी पोस्टपर्यंत नियमित मार्गाने व पुढे सिटी पोस्ट चौकातून डावीकडे वळून स्वारगेट, सारसबाग, टिळक रस्ता, डेक्कन कॉर्नर व पुढे नियमित मार्गाने एनडीएकडून पुणे स्टेशनकडे येताना या मार्गावरील बसेस नियमित मार्गाने संचलनात राहतील.

बस मार्ग क्रमांक 197 व 202 वरील बसेस हडपसरकडून कोथरूड डेपो, वारजे माळवाडीकडे जाताना सिटी पोस्टपर्यंत नियमित मार्गाने व पुढे सिटी पोस्ट चौकातून डावीकडे वळून स्वारगेट, सारसबाग, टिळक रस्ता, डेक्कन कॉर्नर व पुढे नियमित मार्गाने कोथरूड डेपो वारजे माळवाडीकडून हडपसरकडे येताना या मार्गावरील बसेस नियमित मार्गाने संचलनात राहतील.

बसमार्ग क्रमांक 68 वरील बसेस अप्पर डेपोकडे जाताना नियमित मार्गाने व अप्पर डेपोकडून सुतारदराकडे येताना टिळक रस्त्यामार्गे संचलनात राहतील. वॉकिंग प्लाझाची वेळ संपल्यावर वरील सर्व मार्गावरील बसेस पुर्ववत होईल, असे पीएमपीने स्पष्ट ( Pune) केले आहे.

प्रवाशांसाठी शटल बससेवा
– नगरकर तालीम चौक (नूमवि चौक)- बाजीराव रोड-मनपा-नगरकर तालीम चौक मार्गावर दर 30 मिनिटांनी बस
– स्वारगेट-उंबऱ्या गणपती चौक- स्वारगेट मार्गावर दर 40 मिनिटांनी बस
– डेक्कन- उंबऱ्या गणपती चौक- डेक्कन मार्गावर दर 30 मिनिटांनी बस

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.