Pune : पीएमपी बसमध्ये चढताना चाकात पाय अडकून झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज –  पीएमपी बसमध्ये चढत असताना चाकामध्ये ( Pune ) पाय अडकून गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाला. ही घटना सिंहगड रस्त्यावरील दांडेकर पुलाजवळ पेट्रोल पंपासमोर घडली.

काशीबाई खुंरगळे (रा. दांडेकर पूल) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी त्यांचा मुलगा मल्हारी पांडुरंग खुरंगळे (वय 31, रा. दांडेकर पूल) यांनी पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पीएमपी बसचालक दिलीपराव वामनराव लहाने (वय 50, रा. मांजरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

MHT CET Exam : एमएचटी सीईटीचे प्रवेश पत्र संकेतस्थळावर उपलब्ध 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला सोमवारी दुपारी पीएमपी बसमध्ये पाठीमागील दरवाजातून चढत होती. परंतु त्यावेळी बसचालकाने निष्काळजीपणे बस चालवली. त्यामुळे महिलेचा डावा पाय बसच्या चाकामध्ये अडकला. त्यात गंभीर जखमी झाल्यामुळे महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.पर्वती पोलीस याचा पुढील तपास करत ( Pune ) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.