MHT CET Exam : एमएचटी सीईटीचे प्रवेश पत्र संकेतस्थळावर उपलब्ध 

एमपीसी न्यूज – सीईटी सेलच्या वतीने पीसीबी गटासाठी एमएचटी सीईटी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात ( MHT CET Exam)आले आहे. या परीक्षेसाठी सीईटीच्या अधिकृत संकेतस्थळावर (mahacet.org) प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे.

उमेदवारांनी संकेतस्थळावर लॉगिन करून नोंदणीकृत ईमेल आयडी आणि पासवर्ड वापरून प्रवेश पत्राची प्रिंटआऊट घ्यावी. हे प्रवेश पत्र परीक्षेच्या दिवशी परीक्षा केंद्रावर घेऊन जाणे आवश्यक आहे. प्रवेश पत्रामध्ये परीक्षेची तारीख, वेळ, परीक्षा केंद्राचा पत्ता, परीक्षेचे पेपर, उमेदवाराचे नाव, रोल नंबर, नोंदणी क्रमांक, फोटो, स्वाक्षरी असा संपूर्ण तपशील आहे.

Weather Update : कोकण आणि मध्य महाराष्ट्राला यलो अलर्ट

परीक्षा केंद्रांवर प्रवेश करताना प्रवेशपत्र आणि फोटो ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे. प्रवेश पत्राशिवाय उमेदवारांना परीक्षेला बसू दिले जाणार नाही. प्रवेश आणि समुपदेशन प्रक्रिये दरम्यान उमेदवारांना त्यांचे प्रवेश पत्र सुरक्षित ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. वेळापत्रकानुसार पीसीबी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र) गटाची परीक्षा 22, 23, 24, 28, 29 आणि 30 एप्रिल रोजी होणार ( MHT CET Exam)  आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.