Weather Update : कोकण आणि मध्य महाराष्ट्राला यलो अलर्ट

एमपीसी न्यूज – भारतीय हवामान विभागाने कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्राला येलो ( Weather Update ) अलर्ट जारी केला आहे. या भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बुधवारी (दि. 17) राज्यात मालेगाव येथे सर्वाधिक 43.2 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले.

 

वातावरणातील खालच्या थरातील द्रोणिका रेषा दक्षिण विदर्भ ते दक्षिण कर्नाटक, मराठवाडा, उत्तर कर्नाटकातून जात आहे. त्यामुळे हवामानातील बदलामुळे उन्हाचा पारा वाढला आहे. वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील 24 तासात कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट येणार असून धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड आणि धाराशिव या भागासाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.

Pune : उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांच्या शक्ती प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी वाहतुकीत बदल

 

वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे. काही भागात गारपीट देखील झाली आहे. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पुढील दोन ते तीन दिवस विदर्भातील बहुतांश भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात ( Weather Update ) आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.