Skymet on Monsoon : यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्‍यता

एमपीसी न्यूज – एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात भारतीय हवामान विभागाकडून यंदाच्या मान्सून बाबत (Skymet on Monsoon) घोषणा होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर स्कायमेट या खाजगी संस्थेने मानसून बाबत अंदाज व्यक्त केला आहे. यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार असल्याची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे.

Manoj Jarange Patil : लोकसभा निवडणुकीत ज्याला पाडायचे त्याला पाडा म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली राजकीय भूमिका

सध्या अल निनो सक्रिय आहे. एप्रिल किंवा मे दरम्यान ही सक्रियता कमी होऊन तटस्थ (एन्सो) स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. ही स्थिती मान्सूनसाठी सकारात्मक असते. जून ते सप्टेंबर या कालावधीत ला निना सक्रिय असेल. याचा ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान प्रभाव वाढेल. त्यामुळे यंदाचा पावसाळा सरासरीपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे.

इंडियन ओशन डाय पोल ही यंदा सकारात्मक असण्याची शक्यता आहे.  याचाही मान्सूनला फायदा होऊ शकेल. यंदा मान्सून सरासरीच्या 96 ते 104 टक्के पडण्याची शक्यता (Skymet on Monsoon) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.