Manoj Jarange Patil : लोकसभा निवडणुकीत ज्याला पाडायचे त्याला पाडा म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली राजकीय भूमिका

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील ( Manoj Jarange Patil) कडून अपक्ष उमेदवार देण्याबाबत बोलले जात होते. मात्र अपक्ष उमेदवार देणार नसल्याचे जरांगे पाटील यांनी जाहीर केले. तसेच लोकसभा निवडणुकीत ज्याला पाडायचे त्याला पाडा, असे आवाहन पाटील यांनी मराठा समाजाला केले आहे. त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीत 112 उमेदवार देण्याबाबतही त्यांनी जाहीर केले आहे.

Uruli Kanchan : शिंदवणे येथील गावठी दारूच्या भट्टीवर उरुळी कांचन पोलिसांची कारवाई

मनोज जरांगे पाटील यांनी राजकारणात येण्याचे सूतोवाच केले आहे. आपण विधानसभेच्या जागा लढवणार असून उद्यापासून विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश जरंगे पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. मराठा समाजाने कुणाच्याही प्रचाराला जायचे नाही. बारकाईने लक्ष ठेवायचे. आता करेकट कार्यक्रम करायचा. आम्हाला जे लागते ते द्या. मग तुम्ही उताणे पडा किंवा सरळ पडा, त्याच्याशी आम्हाला काहीही घेणंदेणं नाही. आम्हाला राजकारणाशी काही देणे घेणे नाही, असेही मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

जरांगे पाटील म्हणाले की, मी कुणाला मतदान करा म्हणणार नाही. पण जे आरक्षणाच्या बाजूने आहे त्यांनाच मतदान करा. कुणाला पाडायचं हे आता मराठ्यांनी ठरवावे. उद्यापासून विधानसभेच्या तयारीला लागा. आम्ही 112 पेक्षा अधिक विधानसभेच्या जागा लढवणार आहोत.

शिंदे साहेब आरक्षण देतील असे वाटले होते

शिंदे साहेबच आम्हाला आरक्षण देतील असं आम्ही म्हणायचो. पण ते मराठ्यांच्या मनातून उतरले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आमची खूप माया होती. ते कोणत्या पक्षातून कुठे गेले याच्याशी मराठ्यांना काहीच घेणंदेणं नव्हते आणि नाही. देवेंद्र फडणवीस यांना मी सहा महिने काहीच बोललो नाही. ते गुन्हे दाखल करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. तुम्ही काहीच करत नाहीत आणि तुम्हीच आम्हाला राजकारणात ढकलत आहात. ही वेळ तुम्हीच आमच्यावर आणली आहे, असेही जरांगे पाटील ( Manoj Jarange Patil) म्हणाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.