Pune : एमएचटी सीईटी परीक्षेसाठी सहा लाख 19 हजार विद्यार्थ्यांची नोंदणी

एमपीसी न्यूज – बारावीमध्ये विज्ञान शाखेत असलेल्या (Pune) विद्यार्थ्यांची बोर्डाच्या परीक्षेनंतर सीईटी परीक्षेसाठी लगबग सुरु होते. आतापर्यंत पीसीबी आणि पीसीएम ग्रुपच्या सहा लाख 19 हजार 673 विद्यार्थ्यांनी सीईटीसाठी अर्ज केले आहेत.

राज्य सीईटी सेलमार्फत एमएचटी सीईटी प्रवेश परीक्षा राज्यभर घेतली जाते. इंजिनिअरिंग, फार्मसी आणि कृषी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ग प्रवेशासाठी असलेली ‘एमएचटी सीईटी’ या प्रवेश परीक्षेसाठी नियमित शुल्कासह अर्ज करण्याची मुदत संपली आहे. विलंब शुल्क भरून 15 एप्रिल पर्यंत अर्ज करता येणार आहेत.

Shirur : शेतात कांदे काढत असताना मिळाली आनंदाची बातमी; पती, पत्नी दोघांचीही नावे पोलीस भरतीच्या मेरीट लिस्टमध्ये झळकली

8 मार्च ते 7 एप्रिल या कालावधीत पीसीबी ग्रुपच्या दोन लाख 96 हजार 99 तर पीसीएम ग्रुपच्या तीन लाख 23 हजार 574 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.(Pune) व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रकिया संपली आहे.

पीसीबी ग्रुपची प्रवेश परीक्षा 9 ते 13 मे आणि पीसीबी ग्रुपची प्रवेश परीक्षा 15 ते 20 मे या कालावधीत होणार आहे. राज्य सीईटी सेलकडून सीईटी परीक्षा घेण्याची जबाबदारी एका एजन्सीला देण्यात आली आहे. परीक्षेदरम्यान कोणतीही अडचण येऊ नये, याचे काटेकोर नियोजन एजन्सीकडून सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.