Shirur : शेतात कांदे काढत असताना मिळाली आनंदाची बातमी; पती, पत्नी दोघांचीही नावे पोलीस भरतीच्या मेरीट लिस्टमध्ये झळकली

एमपीसी न्यूज – शिरूर तालुक्यातील चांडोह गावात शेतकरी कुटुंब कांदे काढत असताना त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी बातमी मिळाली. (Shirur) शेतकरी असलेले पती आणि पत्नी एकाच वेळी पोलीस दलात भरती झाले. त्यांची नावे मेरीट लिस्ट मध्ये आल्याचे समजताच पतीने पत्नीला शेतात उचलून घेत आनंद साजरा केला.

तुषार म्हातारबा शेलार आणि भाग्यश्री यांचा सन 2020 मध्ये विवाह झाला. घरी शेती असली तरी पोलीस दलात भरती होण्याचे दोघांचेही स्वप्न होते. त्यानुसार त्यांचे प्रयत्न देखील जोरात सुरु होते. सन 2021 च्या पोलीस भरतीसाठी दोघांनीही अर्ज केले होते. भरतीची मैदानी आणि लेखी परीक्षा झाली आता मेरीट लिस्टची वाट पहायची, असे म्हणून दोघांनीही शेतातील कामे सुरु केली.

Ravet : बांधकाम साईटवरील साहित्य चोरीला

बुधवारी शेलार यांच्या शेतात कांदे काढण्याचे काम सुरु होते.(Shirur) त्याच वेळी पोलीस भरतीची अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली. त्या यादीत तुषार आणि भाग्यश्री दोघांचीही नावे असल्याचे त्यांना समजले. पोलीस भरतीची बातमी समजताच हातातील कांदे सोडून तुषार यांनी भाग्यश्री यांना उचलून घेत आनंद साजरा केला.

भाग्यश्री यांनी आपल्या भावना व्यक्त करतना म्हटले की, हे यश कुटुंबाने दिलेल्या साथीमुळे मिळाले आहे. जिद्द, मेहनत आणि चिकाटीने इथवर पोहोचले आहे. मी नवी मुंबई येथे पोलीस झाले.”

आपल्या भावना व्यक्त करताना तुषार यांनी सांगितले की, (Shirur) आज नव्याने लग्न झाल्यासारखे वाटत आहे. यात आई, वडील, भाऊ आणि पत्नीची मोलाची साथ आहे.”

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.