Chikhali : घरकुलमधील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवा

एमपीसी न्यूज – चिखली, घरकुलमध्ये गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न गंभीर झाला (Chikhali) असून स्मार्ट सिटी अंतर्गत या भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाने पालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांना निवदेन देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, घरकुल-चिखलीत 4 एप्रिल रोजी पडक्‍या इमारतीत 17 वर्षाच्या मुलीचा खून झाल्याचे आढळून आले. (Chikhali) या भागात गुंडगिरी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. दर आठवडयात भांडणे, मारामारी या कृत्यांनी येथे वास्तव्यास असलेल्या नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महिला, मुली यांच्याही संरक्षणाचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे.

Chinchwad : पुणे-मुंबई दरम्यान 21 डब्यांची सिंहगड एक्स्प्रेस सुरु करा – चिंचवड प्रवासी संघ

पालिकेने स्मार्ट सिटीच्या अंतर्गत शहरातील विविध भागात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. त्याच अनुषंगाने घरकुलमध्येही सीसीटीव्ही कॅमेरे लावून कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच त्यानंतरही गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना घडल्यास कॅमेऱ्यांमुळे आरोपीच्या मुसक्‍या आवळ्यास पोलीस शक्‍य होणार आहे.

घरकुल परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लवकरात-लवकर लावू, असे आश्‍वासन अतिरिक्त आयुक्त जांभळे यांनी शिष्टमंडळाला दिले आहे. (Chikhali) तसेच सीसीटीव्ही कॅमेरे न लावल्यास पालिका प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माकपचे पुणे जिल्हा सचिव गणेश दराडे, अविनाश लाटकर, बाबासाहेब देशमुख, अमिन शेख, अपर्णा दराडे आदींनी दिला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.