Chinchwad : पुणे-मुंबई दरम्यान 21 डब्यांची सिंहगड एक्स्प्रेस सुरु करा – चिंचवड प्रवासी संघ

एमपीसी न्यूज – पुणे- मुंबई सिंहगड एक्स्प्रेस 21 डब्यांची करावी अशी मागणी चिंचवड प्रवासी संघ यांनी केली आहे.

 

पुणे-मुंबई दरम्यान सकाळी पुणे-मुंबई सिंहगड एक्सप्रेस जाते त्याला चाकरमानी व इतर प्रवाश्यांची गर्दी वर्ष भर असते. सोमवारी(दि.10) महिला डब्यात पासधारक व ऐनवेळी तिकीट काढून प्रवास करणार्‍या महिला प्रवाश्यांमध्ये वादावादी झाली. पिंपरी व चिंचवडसाठी एकाच बोगीत विभागणी रेल्वे विभागाने केली. चिंचवड प्रवासी संघ 1991 सालापासून स्वतंत्र बोगी पिंपरी व चिंचवडसाठी मागणी करीत आहे, अशी लेखी मागणी ही संघाने  दिले आहे .

निवेदनात म्हटले की, पासधारकांची अरेरावीमुळे सामान्य प्रवाश्यांना निमुटपणे प्रवास करावा लागतो. अनेकवेळा भांडणे देखील झाली. परंतु, उपाययोजना मात्र; कोणत्याच केल्या जात नाही. सोमवारी चिंचवड प्रवासी संघाच्या उपाध्यक्षा निर्मला माने तसेच सहकारी दिपाली शिंगोटे, शितल धुर्वे महिला डब्यात प्रवास करीत असताना पासधारक महिला प्रवासी व इतर महिला प्रवाश्यांमध्ये वादविवाद झाला.  (Chinchwad) भांडणे होता-होता वाचली. त्यावेळी माने त्यांना म्हणाल्या पासधारकांनी इतर महिला प्रवासीयांमध्ये वादविवाद करू नये, असे त्यांना म्हणाल्या पासधारकांनी इतर महिला प्रवासीयांनाही समजून घेतले पाहिजे. पास काढला म्हणून वेगळे काय केले, आम्ही देखील तिकिटे काढलीत कधी तरी प्रवास करणार्‍या महिलांनी हि समजून घेतले पाहिजे, अशी भूमिका चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार यांच्याकडे केली.

Pimpri : चला या उन्हाळा सुट्टीत मुलांसोबत तुम्हीही घोडस्वारी शिका… 

पिंपरी व चिंचवडसाठी स्वतंत्र बोगी सामान्य प्रवासीयांसाठी असलीच पाहिजे. त्यासाठी वारंवार रेल्वे प्रशासनाकडे मागणी करीत आहोत. पूर्वी डबल डेकर सुरु होती. ती अचानक बंद केली. सध्या सिंहगडला 17 डबे आहेत. लोणावळा येथे दोन बोगी उघडल्या जातात. पुणे ते लोणावळा 63 कि.मी. चा प्रवास बोगीत चिटपाखरू नसते. 17 ऐवजी 21 डब्यांची सिंहगड एक्स्प्रेस सुरु करण्यात यावी.

पिंपरी-चिंचवडला स्वतंत्र बोगी सर्वसाधारण प्रवासीयासाठी असावी पासधारकांची अरेरावी बंद करण्यासाठी रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (आर.पी.एफ) जनरल रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (जी.आर.पी.एफ.) पुरुष व महिला पोलीस बंदोबस्त सिंहगड एक्स्प्रेसमध्ये नियमित सुरु करण्यात यावा., डबल डेकर कोकण मार्गावर धावते.(Chinchwad)  मध्यरेल्वे मार्गावरही सोडण्यात यावी, अशी मागणी चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार, उपाध्यक्षा निर्मला माने, मुकेश चुडासमा, हार्दिक जानी, नयन तन्ना, सुरज आसदकर, मनोहर जेठवानी, इकबाल सय्यद, संदीप शहा, नारायण भोसले आदींनी रेल्वे मंत्र्याकडे केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.