Chinchwad News : एमएचटी सीईटी परीक्षेत प्रथम आलेल्या सौरभ जोगचा सत्कार

एमपीसी न्यूज – एमएचटी सीईटी परीक्षेत प्रथम आलेल्या सौरभ जोगचा चिंचवडगांव येथील फत्तेचंद जैन महाविद्यालयात सत्कार करण्यात आला. जोग याचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करुन त्याला भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

चिंचवडगावातील फत्तेचंद जैन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्याचा गुणगौरव सोहळा पार पडला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी संस्थेचे सचिव राजेंद्र मुथा, सहसचिव अनिल कांकरिया, प्राचार्या सुनिता नवले, विज्ञान विभाग प्रमुख संजय पाटील, उपप्राचार्य गुंजाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.