Ind Vs Aus T20 Series : अखेरच्या T-20 मध्ये कांगारुंची बाजी ; विराटची 85 धावांची खेळी व्यर्थ

एमपीसी न्यूज – T20 मालिकेत ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश देण्याचा भारतीय टिमचा मनसुब्यावर ऑस्ट्रेलियाने पाणी फिरवलं. तिसऱ्या व अखेरच्या T20 सामन्यात 12 धावांनी बाजी मारत कांगारुंनी T2 मालिकेचा शेवट गोड केला. 187 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा कर्णधार विराट कोहलीने 85 धावांची आक्रमक खेळी केली. परंतू, दुसऱ्या बाजूने इतर फलंदाजांची साथ न लाभल्याने भारताला पराभवाचा सामना करावा लागला.

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 187 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. ग्लेन मॅक्सवेल टाकत असलेल्या पहिल्याच षटकात लोकेश राहुल मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात माघारी परतला. यानंतर शिखर धवन आणि विराट कोहलीने दुसऱ्या विकेटसाठी महत्वपूर्ण अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला.

विराटने आक्रमक पवित्रा घेत फटकेबाजी करत धावांचा ओघ वाढवण्यास सुरुवात केली. मात्र ही जोडी फोडत स्वेप्सनने शिखर धवनला माघारी धाडलं. त्यानंतर संजू सॅमसननेही स्वस्तात मागे परतला.

दुसरीकडे विराटने एक बाजू लावून धरत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. सॅमसननंतर श्रेयस अय्यरही शून्यावर बाद झाला. हार्दिक पांड्याने काही मोठे फटके लरावत सामन्यात रंगत आणली मोठा खटका खेळण्याच्या नादात पंड्या बाद झाला.

19 षटकात अँड्रू टायने विराटला माघारी धाडलं आणि व्हाईटवॉश देण्याचा भारतीय टिमच्या मनसुब्यावर ऑस्ट्रेलियाने पाणी फिरवलं.

ऑस्ट्रेलियाची सुरूवात खराब झाली पुनरागमन करणारा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंच सुंदरच्या गोलंदाजीवर भोपळाही न फोडता माघारी परतला. यानंतर मॅथ्यू वेड आणि स्टिव्ह स्मिथ यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला.

ही जोडी ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारुन देणार असं वाटत असतानाच सुंदरने स्टिव्ह स्मिथचा (24) त्रिफळा उडवत भारताला दुसरं यश मिळवून दिलं.

मॅथ्यू वेडने शानदार फटकेबाजी करत अर्धशतक झळकावलं. मैदानात जम बसल्यानंतर भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत वेडने सिडनीच्या मैदानावर चौफर फटकेबाजी केली. ग्लेन मॅक्सवेलनेही आपल्याला मिळालेल्या जीवदानाचा पुरेपूर फायदा घेत काही सुरेख फटके खेळले.

वेड आणि मॅक्सवेल जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 90 धावांची भागीदारी केली. दरम्यान शार्दुल ठाकूरने वेडला तर नटराजनने मॅक्सवेलला माघारी धाडत कांगारुंची जोडी फोडली. वेडने 80 तर मॅक्सवेलने 54 धावांची खेळी केली. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने 2 तर नटराजन आणि शार्दुलने 1-1 बळी घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.