T20 – ऑस्ट्रेलियाचा 44 धावांनी धुव्वा; भारताची मालिकेत 2-0 ने आघाडी

एमपीसी न्यूज : भारताने ऑस्ट्रेलियाला 44 धावांनी धूळ चारत (T20) सामन्यात एकतर्फी विजय मिळवला. या विजयासह पाच ट्वेंटी-ट्वेंटी सामन्याच्या मालिकेत भारताने 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

तिरुअनंतपुरम येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या ट्वेंटी-ट्वेंटी सामन्यात नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाने भारताला प्रथम फलंदाजी साठी आमंत्रित केले.

भारताच्या वतीने प्रथम फलंदाजी करताना यशस्वी जैस्वाल ने 212 च्या स्ट्राईक रेटने 25 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांची आतषबाजी करत 53 धावांची खेळी केली.

भारताकडून ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जयस्वाल यांनी पहिल्या गड्यासाठी 77 धावांची भागीदारी रचली. त्यानंतर आलेल्या ईशान किशनने धावगती कायम ठेवत तुफान फटकेबाजी केली. त्याने 32 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकार खेचत 52 धावांची खेळी केली.

स्टोईनिसला फटका लगावण्याच्या नादात तो झेलबाद झाला. दरम्यान एक बाजू लाऊन धरत ऋतुराज गायकवाड ने 43 चेंडूत 58 धावांची तुलनेने सावध खेळी केली. शेवटच्या षटकांमध्ये स्फोटक युवा (T20) फलंदाज रिंकू सिंघने 344 च्या स्ट्राईक रेटने 9 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 31 धावा कुटल्या. तत्पूर्वी सुर्यकुमार यादवने 19 धावांची झटपट खेळी केली.

यावेळी भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत 4 गड्यांच्या मोबदल्यात 235 धावांचे विशाल लक्ष्य उभे केले.

या विशाल लक्ष्याच्या पाठलाग करतांना ऑस्ट्रेलियाने देखील दमदार सुरुवात केली. तिसऱ्या षटकात फिरकी गोलंदाज रवी बिष्णोई ने पहिला गडी बाद केला.

मागील सामन्याप्रमाणे यावेळीही मेथ्यु शोर्ट 19 धावा करून त्रिफळाचीत झाला. त्यानंतर मागील सामन्यात शतक झळकावणारा जॉस इंग्लिस देखील बिष्णोईला फटका मारण्याच्या नादात झेलबाद झाला. घातक ठरेल असे वाटणाऱ्या मॅक्सवेलला अक्षर पटेलने यशस्वी जैस्वाल करवी मिडऑनवर झेलबाद केले.

पाठोपाठ स्टीव स्मिथ देखील 19 धावा करून बाद झाला. अश्विनी त्याचा अप्रतिम झेल टिपला. त्यानंतर आलेल्या मार्कस स्टोईनिस आणि टीम डेविड यांनी भारतीय गोलंदाजांना धो धो धुतले. चौकार आणि षटकारांची चौफार फटकेबाजी केली.

Talegaon Dabhade : विठ्ठल मंदिरात तुलसी विवाह उत्साहात संपन्न

या दोघांनी पाचव्या गड्यासाठी 81 धावांची भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान बिश्नोईने टीम डेव्हिडला ऋतुराज करवी झेलबाद करत ऑस्ट्रेलियाला पुन्हा संकटात टाकले.

आवश्यक धावगती राखून लक्षाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचे फलंदाज एका पाठोपाठ एक अंतरावर बाद होत गेले . तथापि, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार वेड याने एक बाजू लावून धरत 42 धावांची खेळी केली.

मात्र ऑस्ट्रेलियाला 20 षटकांत 9 बाद 191 धावा पर्यंतच मजल मारता आली. यावेळी भारतीय गोलंदाजांनी प्रभावी मारा केला.

रवी बिष्णोईने 4 षटकात 31 धावा देत महत्वपूर्ण 3 गडी बाद केले. तसेच प्रसिद्ध कृष्णा देखील तीन बळी मिळवले, मुकेश कुमार हर्षदीप सिंग आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 1 गाडी बाद केला.

भारताने ऑस्ट्रेलियाला 44 भावाने पराभूत करत मालिकेत आघाडी घेतली. करणारा सलामीवीर यशस्वी जयस्वाल सामनावीराचा मानकरी ठरला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.