Today’s Horoscope 27 November 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग -Today’s Horoscope 27 November 2023
आजचा दिवस – सोमवार.
तारीख – 27.11.2023
शुभाशुभ विचार – 14 नंतर चांगला दिवस.
आज विशेष – गुरुनानक जयंती, तुलसी विवाह समाप्ती.
राहू काळ – 7.30 ते 09.00
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आज नक्षत्र – कृतिका 11.35 पर्यंत नंतर रोहिणी.
चंद्र राशी – वृषभ.
—————————–
मेष – ( शुभ रंग – डाळिंबी)
व्यवसायात उत्तम आर्थिक यश मिळून स्वतःचे वेगळेच स्थान निर्माण होईल. आज तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रातील नवोदित मंडळींना ही योग्य मार्गदर्शन करू शकाल.

वृषभ ( शुभ रंग- पिस्ता)
आज तुम्ही काहीसे बेफिकीरपणे वागाल. स्वतः तेच खरे करण्याकडे तुमचा कल असेल. आज तुम्ही अति उत्साहाच्या भरात काही चुकीचे निर्णय घ्याल.

मिथुन – ( शुभ रंग- मोरपंखी)
अनावश्यक खर्चावर लगाम घालण्याची गरज आहे. आज दिवसाच्या उत्तरार्धात काही अति आवश्यक खर्च हात जोडून उभे राहू शकतात. काही अनपेक्षित घटना घडतील.

कर्क – ( शुभ रंग – राखाडी)
एखाद्या नवीन उपक्रमाचा श्री गणेशा करण्यासाठी आज दिवस उत्तम आहे. हार्डवर्क पेक्षा स्मार्टवर्क करून कामे लवकर उरकता येतील. काही अपुरी स्वप्न साकार होतील.

सिंह -( शुभ रंग – पांढरा)
वेळीच घेतलेल्या योग्य निर्णयामुळे कार्यक्षेत्रात यशाचा मार्ग सोपा होईल. आज कर्तव्यास प्राधान्य देणे गरजेचे आहे. रिकाम टेकड्या मित्रमंडळींना दुरूनच रामराम करा.

कन्या – ( शुभ रंग- हिरवा)Today’s Horoscope 27 November 2023
आज तुम्हाला वाढत्या जबाबदाऱ्यांचे दडपण येण्याची शक्यता आहे. बेकायदेशीर कृत्ये अंगाशी येऊ शकतात. सरकारी नियमांचे उल्लंघन करू नका. नाकासमोर चाललेले बरे.

तूळ ( शुभ रंग- चंदेरी)
आज कोणतीही धाडसाची कामे तसेच मोठ्या आर्थिक व्यवहार टाळावेत. कामगार वर्गाने स्वतःच्या सुरक्षेस प्राधान्य द्यावे. हातचे सोडून पळत्या मागे धावू नका.

Talegaon Dabhade : विठ्ठल मंदिरात तुलसी विवाह उत्साहात संपन्न

वृश्चिक ( शुभ रंग – गुलाबी)
नोकरीच्या ठिकाणी आज कामाचा ताण कितीही वाढला तरीही तुम्हाला वरिष्ठांचे सहकार्य राहील. घरात जोडीदाराकडूनही तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील. काही शुभ समाचार येतील.

धनु (शुभ रंग- राखाडी)
नोकरदारांना वरिष्ठ आज गोड बोलून राबवून घेतील. काही आरोग्यविषयक समस्यांवर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. कुणालाही सल्ले देऊ नका.

मकर (शुभ रंग- सोनेरी)
आज तुमच्यात चैनी व विलासे वृत्ती बाळावेल. कमी श्रमात जास्त लाभाची स्वप्ने पहाल. आज मौज मजेस तुमचे प्राधान्य असेल. प्रकृती आज उत्तम साथ देणार आहे.

कुंभ – (शुभ रंग- मोरपंखी)
बरेच दिवसापासून रेंगाळलेल्या घरगुती कामात आज लक्ष देणे तुम्हाला गरजेचे वाटेल. गृह उद्योग करणाऱ्या महिलांची मिळकत चांगली राहील. मुले अभ्यासात लक्ष देतील.

मीन ( शुभ रंग- केशरी)
अहंकारास थारा देऊ नका. मृदू वाणीनेच अनेक अवघड कामे सोपी होतील. शेजारी आपलेपणानेच डोकावतील. आज महत्त्वाचे निर्णय अनुभवींच्या मार्गदर्शनाने घ्या.

श्री जयंत कुळकर्णी.
ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.
फोन 9689165424

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.