Talegaon Dabhade : विठ्ठल मंदिरात तुलसी विवाह उत्साहात संपन्न

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील शाळा (Talegaon Dabhade)चौकातील श्री विठ्ठल मंदिरात तुलसी विवाह व अन्नकोट कार्यक्रम अतिशय भक्तिभावाने व उत्साहाने संपन्न झाला. या उत्सवात भाविकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला होता.

श्री विठ्ठल मंदिरात पहाटे भारतीय जनता पक्षाचे (Talegaon Dabhade)माजी शहराध्यक्ष संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील यांच्या हस्ते पुजा व काकड आरती करण्यात आली. तर श्री विठ्ठल मंदिर संस्थानचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री संजय बाळा भेगडे यांच्या हस्ते आरती व प्रसाद वाटप करण्यात आला.

Pune : प्रोजेक्ट टायगर’ प्रोजेक्ट टायगर’ व्याघ्र प्रकल्पाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त प्रदर्शन

मंदिरातील तुलसी विवाहाचे आयोजन ह.भ.प.ज्ञानेश्वर तथा माऊली महाराज दाभाडे, यतिनभाई शहा, अतुल देशपांडे यांनी केले. तुलसी विवाहानंतर अन्नकोटमधील पदार्थाचे व प्रसादाचे वाटप उपस्थित भाविकांना करण्यात आले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.