Pune : प्रोजेक्ट टायगर’ प्रोजेक्ट टायगर’ व्याघ्र प्रकल्पाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त प्रदर्शन

एमपीसी न्यूज – भारतातील वन्यजीव संवर्धनासाठी राबवल्या (Pune )जाणाऱ्या महत्वाच्या प्रकल्पांपैकी ‘प्रोजेक्ट टायगर’ला’ पन्नास वर्षे पूर्ण झाली,वन्यजीव संवर्धनाच्या या यशस्वी प्रकल्पाच्या सुवर्ण महोत्सवाचे कौतुक करण्यासाठी ‘जीविधा’ संस्थेतर्फे 29 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर 2023 या कालावधीत यशवंतराव चव्हाण कलादालन, कोथरूड, पुणे येथे ‘व्याघ्र प्रकल्पाची पन्नास सोनेरी वर्षे’ या संकल्पनेवर आधारित प्रदर्शन आयोजित केले आहे.

 

या प्रदर्शनाद्वारे वाघांच्या संवर्धनात ‘ व्याघ्र प्रकल्पांची’ भुमिका , स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठीचे प्रयत्न, व्याघ्र प्रकल्पांसमोरील भावी काळातील आव्हाने यासारख्या विषयांची माहिती पोस्टरद्वारे करून दिली जाणार आहे.

Pimpri : संवैधानिक अधिकारांसोबत कर्तव्यांचेही पालन करा ! – शंकर जगताप

प्रदर्शनाचे उद्घाटन माजी प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये व (Pune )दै. सकाळ, पुणे आवृत्तीचे संपादक सम्राट फडणीस यांच्या हस्ते बुधवार , 29 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडे सहा वाजता होणार असल्याची माहिती जीविधा संस्थेचे अध्यक्ष राजीव पंडित यांनी दिली.

त्यासोबतच या वर्षीपासून जीविधा संस्थेचे वतीने ‘महाराष्ट्राच्या व्याघ्र प्रकल्पातील सर्वोत्कृष्ट गाईड’ हा पुरस्कार दिला जाणार आहे. या पुरस्काराचा पहिला मानकरी म्हणून जीविधा ने नेमलेल्या समितीने ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील कोअर मधे काम करणाऱ्या शहनाज बेग यांची निवड केली आहे. त्यांचा सत्कार शुक्रवार ,1 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच ते सात वाजता करण्यात येणार आहे.

 

शहनाज बेग महाराष्ट्रातील पहिल्या महिला गाईड आहेत व ताडोबा मधील पुरूष गाईडचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी लढा देऊन महिलांना गाईड बनण्यासाठी प्रोत्साहन दिले व अनेक महिलांना गाईड म्हणून तयार केले.

या कार्यक्रमाला वनखात्याचे पुणे शहराचे मुख्य वनसंरक्षक एन आर प्रविण उपस्थित राहणार आहेत. त्यांनी ताडोबा चे फिल्ड डायरेक्टर म्हणून काम बघितले आहे. जीविधा संस्थेचे अध्यक्ष राजीव पंडित हे गाईडना ट्रेनिंग देण्याचे व लोकांना जंगलात घेऊन जाण्याचे काम करतात. या सत्कार समारंभा नंतर शहनाज बेग, एन.आर. प्रवीण व राजीव पंडित यांची मुलाखतीचा कार्यक्रम असणार आहे . तीघांच्या एकत्र मुलाखती मधून व्याघ्र प्रकल्पाविषयी विविध अंगाने माहिती पुणेकरांना मिळेल.

या अभिमानास्पद प्रकल्पाची माहिती मिळवण्यात समाजाचा सहभाग असावा, म्हणून जीविधा संस्थेतर्फे यावर्षी प्रौढांसाठी पोस्टर स्पर्धा, शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा अशा तीन स्पर्धांचे आयोजन केले आहे.निबंध, चित्रकला व पोस्टर स्पर्धेच्या विजेत्यांचा सत्कार समारंभ रविवार, दि. 3 डिसेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता होणार आहे.

‘प्रोजेक्ट टायगर’ची 50 वर्षे
पन्नास वर्षे भारतातील वन्यजीव संवर्धनासाठी राबवल्या जाणाऱ्या महत्वाच्या प्रकल्पांपैकी ‘प्रोजेक्ट टायगर’ला पंन्नास वर्षे पूर्ण झाली. तत्कालीन पंतप्रधान माननीय श्रीमती इंदिरा गांधी यांनी 1 एप्रिल 1973 ला प्रोजेक्ट टायगर या प्रकल्पाची घोषणा केली.

त्यावेळेस 9 जंगलं व्याघ्र प्रकल्पांतर्गत संरक्षित केली गेली. सध्या भारतात 54 व्याघ्र प्रकल्प आहेत. जगातील 70 टक्के वन्य वाघ भारतात आहेत हे प्रोजेक्ट टायगरचे यश आहे. भारतात सरकारने आपल्या राष्ट्रीय प्राण्याचे संरक्षण करण्यासाठी व्याघ्र प्रकल्प निर्माण करणे, शिकारीविरोधात कायदे लागू करणे आणि संवर्धनाच्या प्रयत्नांमध्ये लोकसमुदायाच्या सहभागास प्रोत्साहन देणे यासारखी अनेक पावले उचलली आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.