Pimpri : संवैधानिक अधिकारांसोबत कर्तव्यांचेही पालन करा ! – शंकर जगताप

एमपीसी न्यूज – सामाजिक आणि आर्थिक न्याय, आचार,विचार, धर्म, श्रद्धा यांचे (Pimpri)स्वातंत्र्य आणि राजकीय समानता व समान संधी देण्याचे अभिवचन देणारे भारतीय संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण भारतीयांनी अंगिकृत केले. आजच्या या मंगलदिनी संविधानातील अधिकार स्वातंत्र्यासोबतच कर्तव्ये आणि जबाबदारी पालनाचाही संकल्प प्रत्येक नागरिकाने केला पाहिजे, असे आवाहन भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केले.

पिंपरी-चिंचवड भाजपाच्या वतीने पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे भारतीय संविधान दिनी अभिवादन करण्यात आले. यावेळी संविधानातील ‘‘उद्देशिका’’ पालन करण्याची शपथ घेण्यात आली.

Pune : महात्मा फुले पुण्यतिथी निमित्त मंगळवारी अभिवादन मिरवणुकीचे आयोजन

यावेळी मावळ लोकसभा संयोजक सदाशिव खाडे, पिंपरी विधानसभा प्रमुख (Pimpri)अमित गोरखे, महिला मोर्च्याच्या अध्यक्षा सुजाता पालांडे, सरचिटणीस वैशाली खाड्ये, भाजपा उपाध्यक्ष माऊली थोरात, शहर सरचिटणीस संजय मंगोडेकर, नामदेव ढाके, शहर कार्यकारिणी सदस्य निता कुशारे, माजी नगरसेवक बाबा त्रिभुवन, सागर अंगोळकर, संतोष कांबळे, माजी नगरसेविका सविता खुळे, मा. स्वीकृत सदस्य विठ्ठल भोईर,

मंडल अध्यक्ष संदीप नखाते, निलेश अष्टेकर, प्रसाद कस्पटे, सोमनाथ भोंडवे, आयुष्यमान भारत संयोजक गोपाळ माळेकर, ओबीसी मोर्च्याचे अध्यक्ष राजेंद्र राजापूरे, सहकार सेलचे अध्यक्ष माधव मनोरे, उत्तर भारतीय आघाडीचे अध्यक्ष आकाश भारती, सामाजिक कार्यकर्ते नवनाथ जांभूळकर, कृष्णा भंडलकर, श्रीकांत पवार, प्रकाश जावळकर, दीपक भंडारी, हृषीकेश कांबळे, सागर बिरारी, उज्ज्वला गावडे, सोना गडदे, नीता मुंगसे आदी उपस्थित होते.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.