Pune : संविधान दिनानिमित्त आयोजित संविधान सन्मान दौड उत्साहात साजरा ; ३१ देशांचे मिळून ७ हजार स्पर्धक सहभागी

एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संविधान दिनानिमित्त (Pune)आयोजित संविधान सन्मान दौड (मिनी मॅरेथॉनचे) जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाली. संविधानाविषयी जागृतता निर्माण व्हावी यासाठी विद्यापीठातील खाशाबा जाधव क्रीडा संकुल येथे झालेल्या या दौडमध्ये ३१ देशातील विद्यार्थी मिळून जवळपास ७ हजार स्पर्धक सहभागी झाले होते.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती पुणे, डॉ .बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी ) आणि पुणे जिल्हा हौशी ॲथलेटीक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या दौडचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील व (Pune)सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांच्या हस्ते ध्वज दाखवून उद्घाटन करण्यात आले.

Talegaon : तळेगाव खिंडीत उसाचा ट्रॅक्टर पलटी; महामार्गावर वाहनांच्या लांब पर्यंतरांगा

याप्रसंगी पुणे शहर पोलिस आयुक्त रितेश कुमार, बार्टीचे महासंचालक सुनिल वारे, उप्पर पोलिस महासंचालक कृश्न प्रकाश, सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पुणे महानगरपालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, माजी उपमहापौर सुनिता वाडेकर, पुणे जिल्हा एथलिटीक्स असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. अभय छाजेड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक समिती, पुण्याचे अध्यक्ष तसेच या स्पर्धेचे आयोजक परशुराम वाडेकर, विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना, भारत हा एकमेव देश आहे जिथे स्वातंत्राच्या पहिल्या दिवसापासून सर्वांना समान अधिकार मिळाला आहे. यासाठी डॉ. बाबासाबेह आंबेडकरांचे मोठे योगदान असून त्यांनी लोकशाही समृद्ध करण्याचे काम केले, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. चंद्रकांत पाटील यांनी केले. तसेच सध्यस्थितीत देशाला संविधानाच्या मूल्यांची गरज असून त्यासाठी या सारखे संविधान जनजागृतीचे कार्यक्रम राबविण्याची गरज असल्याचे या स्पर्धेचे आयोजक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक समिती, पुण्याचे अध्यक्ष परशुराम वाडेकर म्हणाले. यावेळी सर्व उपस्थितांनी संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचनही केले.

१६ वर्षाखालील मुला/मुलीसांठी ३ किमी, २० वर्षाखालील मुला/मुलीसांठी ५ किमी तर सर्वांसाठी खुली १० किमी अशा तीन गटात ही स्पर्धा घेण्यात आली होती. तसेच दिव्यांग असलेल्या माजी सैनिकांसाठीही पॅरा मॅराथॉनचे आयोजन करण्यात आले होते.

दरम्यान या स्पर्धेत धावू न शकणाऱ्या महिलांनी ‘वॉक फॉर संविधान’ रॅली काढली होती. या वॉकची सुरुवात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून झाली, पुढे जाऊन विद्यापीठातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीचा समारोप झाला.

जिंकलेल्या सर्व स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते मॅडेल, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला. तसेच याप्रसंगी जागतिक पातळीवर धावपटू म्हणून नामांकन मिळवलेल्या अवंतिका नरळे, स्वेच्छा पाटील, शुभम भंडारे आणि प्रणव गुरव या खेळाडूंचाही विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या आधी शालेय विद्यार्थीनींनी झुम्बाचे सादरीकरण करत वातावरणात उर्जा निर्माण केली होती. यावेळी सर्व उपस्थित स्पर्धकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

संविधान सन्मान दौड स्पर्धेचा निकाल
10 किमी पुरूष
अंकुश लक्ष्मण हाके
प्रवीण बबन कांबळे
दयाराम रमेश गायकवाड


5 किमी पुरूष
हितेश संतोष शिंदे
देविदास धनराज बारे
धीरज रामप्रकश चंदेल


3 किमी पुरूष
मनीष संजय मेश्राम
अशोक गणपत उंडे
सुभाष ज्ञानेश्वर कानोजिया

10 किमी महिला
राणी सदाशिव मुचंडी
अर्चना आढाव
ऋतुजा शंकर माळवदकर
5 किमी महिला
प्रियांका लालस ओकास
गायत्री गणेश चौधरी
सुहानी खोब्रागडे

3 किमी महिला
माधुरी चंद्रकांत वानवारे
नेत्रा गणेश मच्छा
श्रद्धा संदीप निकम
————
आंतरराष्ट्रीय विद्यार्थी
10 किमी महिला
सलाम – इथोपिया
मासाऊ – बांगलादेश
इव्हा – पोलंड

5 किमी महिला
सुचेता – थायलंड
मकारा – कंबोडिया
ओलव्हिया – पोलंड

3 किमी महिला
ऊर्मिला – बांगलादेश
नफोसिया – उसबेगिस्तान
दृष्टी – बांगलादेश

10 किमी पुरूष
महम्मद – झांबिया
रेहमान – अफगाणिस्तान
मामाझिया – अफगाणिस्तान

5 किमी पुरूष
हारून – अफगाणिस्तान
मोहित – नेपाळ
इगोर – मोझांबिक

3 किमी पुरूष
अली – चार्ड
इस्माईल – सोमालिया
दीपो – बांगलादेश
—————–
पॅरा मॅरेथॉन
तपस कुमार राय
फुलसिंग
अभिजित पाटील
धरमविर सिंग

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.