Talegaon : तळेगाव खिंडीत उसाचा ट्रॅक्टर पलटी; महामार्गावर वाहनांच्या लांब पर्यंतरांगा

एमपीसी न्यूज – जुना पुणे मुंबई महामार्गावर तळेगाव खिंडीत (Talegaon)उसाचा ट्रॅक्टर पलटी झाला. ही घटना रविवारी (दि. 26) सायंकाळी घडली यामुळे महामार्गावर लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या.

तळेगाव दाभाडेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे (Talegaon)यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी तळेगाव कडून सोमाटणे फाट्याकडे जाणारा उसाची ट्रॉली जोडलेला ट्रॅक्टर पलटी झाला. महामार्गावर ही घटना घडल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली.

Bhosari : भास्कर धावडे यांचे निधन; आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित कार्यक्रम रद्द

मावळ तालुक्यातून कासारसाई येथील संत तुकाराम सहकारी साखर कारखान्यात ऊस वाहतूक केली जाते. रविवारी तळेगाव शहराकडून सोमटणे फाटा मार्गे कारखान्याच्या दिशेने उसाने भरलेला ट्रॅक्टर जात होता. जुन्या पुणे मुंबई महामार्गावर असलेल्या खिंडीत चालकाचे ट्रॅक्टर वरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर पलटी झाला.

ट्रॉलीमधील संपूर्ण ऊस महामार्गावर सांडला गेला. यामुळे मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली. लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. अनेकांना बराच वेळ वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी तसेच तळेगाव दाभाडे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. काही कालावधी नंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.