Pune : महात्मा फुले पुण्यतिथी निमित्त मंगळवारी अभिवादन मिरवणुकीचे आयोजन

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ (Pune)आणि आझम कॅम्पसमधील संलग्न संस्थांच्या वतीने महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त अभिवादन मिरवणूक काढण्यात येणार आहे. ही मिरवणूक मंगळवार, दि.28 नोव्हेंबर रोजी सकाळी 8.30 वाजता आझम कॅम्पस(पुणे कॅम्प) येथून निघणार आहे.

मिरवणुकीचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष तसेच (Pune)डॉ. पी.ए.इनामदार युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉ. पी.ए.इनामदार यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती संस्थेचे सचिव इरफान शेख यांनी दिली. संस्थेच्या 30 आस्थापनांमधील 8 हजार विद्यार्थी,शिक्षक,कर्मचारी अभिवादन मिरवणुकीमध्ये सहभागी होतील. महात्मा फुलेंच्या वेशातील विद्यार्थी बग्गीत बसणार आहेत. दरबार ब्रास बँड,बग्गी, बैलगाडी,महात्मा फुलेंचे सामाजिक संदेशाचे फलक घेऊन विद्यार्थी,पदाधिकारी,शिक्षक,प्राध्यापक सहभागी होणार आहेत.

Alandi: श्री ज्ञानेश्वर विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा

मिरवणुकीचा मार्ग आझम कॅम्पस, पूना कॉलेज, गोल्डन ज्युब्ली, काशीवाडी, टिंबर मार्केट, सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन, बब्बनमियाँ चौक, रिझवानी मशिद, मीठगंज पोलीस चौकी, मोमीनपुरा, चाँदतारा चौक, महात्मा फुले वाडा असा आहे.

अभिवादन मिरवणूक उपक्रमाचे हे 19 वे वर्ष आहे. दरवर्षी ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’( आझम कॅम्पस)च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महंमद पैगंबर यांना अभिवादन करण्यासाठी भव्य मिरवणुका काढल्या जातात.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.