Talegaon : ‘प्रियभाई एक कविता हवीय’……अप्रतिम सादरीकरणाने तळेगावकर रसिक भारावले

एमपीसी न्यूज : “कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम” या (Talegaon) गीताच्या सुरेल सुरांमधून “शब्दावाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले” हे भाव व्यक्त करणारा “प्रिय भाई, एक कविता हवी आहे” या नेत्रसुखद, सुरेलइ आणि अभिनयाने सजलेल्या कार्यक्रमाला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. निमित्त होते तळेगाव दाभाडे येथील कलापिनी संस्थेचे संस्थापक डॉ. शं. वा. परांजपे यांच्या स्मृतिदिनाचे. “आधी केलेची पाहिजे” या शीर्षकाखाली कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

यावेळी सुप्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे, अमित वझे, मानसी वझे, संस्थेचे अध्यक्ष विनायक अभ्यंकर, कार्याध्यक्षा अंजली सहस्त्रबुद्धे, श्रीशैल गद्रे, अरविंद परांजपे, प्रशांत दिवेकर, हेमंत झेंडे, संजय मालकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी कै. डॉ. शं. वा. परांजपे नाट्य संकुलाच्या पडद्याचे अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीत करून कलापिनीच्या कै.डॉ.शं.वा.परांजपे रंगमंच रसिकार्पण करण्यात आला.

विनायक लिमये आणि सहकाऱ्यांच्या “आम्ही चालवू हा पुढे वारसा” या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर अंजली कऱ्हाडकर यांनी ‘डहाळी’ ही कविता सादर केली.

डॉ. शं. वा. परांजपे यांच्यावर कै. गो. नी. दांडेकर यांनी लिहिलेल्या लेखावर आधारित ध्वनिचित्रफित दाखविण्यात आली. विराज सवाई, शार्दूल गद्रे आणि आशुतोष परांजपे यांच्या सहकार्यातून ही ध्वनिचित्रफित तयार करण्यात आली होती.

कलाकारांच्या वतीने अमित वझे, मानसी वझे, अंजली मराठे, सुजित यांचा सत्कार करण्यात आला.

सुनील कोठारी, राजेश परमार, सुजित मळ्ळी, जितेंद्र पावगी, सचिन गुप्ते यांचा नाट्यसंकुलाच्या कामातील विशेष सहकार्याबद्दल सत्कार करण्यात आला.

कलापिनीच्या कलाकारांनी 34 वर्षांपूर्वी झालेल्या इंग्लंड दौऱ्यात (Talegaon) मिळालेल्या मानधनाच्या रकमेची मुदतठेव करून होणाऱ्या रंगमंचाच्या पडद्यासाठीच याचा विनियोग होईल असे ठरवून घसघाशीत रक्कम पडद्यासाठी सुपूर्द केली.

अंजली कऱ्हाडकर, श्रीशैल गद्रे, विश्वास देशपांडे, अशोक संभूस, डॉ अनंत परांजपे, सीमा सवडकर – जोशी यांनी प्रातिनिधिक स्वरुपात ही रक्कम दिली. अतिशय हृद्य अशा या कार्यक्रमाचे अमित वझे यांनी त्यांच्या मनोगतात विशेष कौतुक केले. उत्तम आणि नेटके संयोजन तसेच दर्दी रसिक हे कलापिनीचे वैशिष्ट्य आहे असेही ते म्हणाले.

Today’s Horoscope 27 November 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

मुक्ता बर्वे अमित वझे, मानसी वझे, अंजली मराठे, पार्थ उमराणी, निनाद सोलापूरकर यांनी “प्रिय भाई.. एक कविता हवी आहे” या कार्यक्रमातून पु. ल. आणि सुनीताबाई यांच्या परिपूर्णतेने आणि रसिकतेने साहित्याचा आस्वाद घेण्याच्या सहज वृत्तीचा अविष्कार घडवला.

उपस्थित रसिकांनी सगळ्या कविता, गीते आणि अभिनयाला भरभरून दाद दिली. कधी हशा, कधी टाळ्या तर कधी अश्रू अशी दाद मिळाल्याने प्रयोग उत्तरोत्तर रंगत गेला.

विनायक अभ्यंकर यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. अंजली सहस्त्रबुद्धे यांनी आभार मानले. डॉ विनया केसकर आणि डॉ. अनंत परांजपे यांनी सूत्रसंचालन केले.

अभिलाष भवार, प्रतिक मेहता, शार्दूल गद्रे, चैतन्य जोशी, शामली देशमुख, स्वच्छंद, हृतिक पाटील, आदित्य धामणकर आदींनी संयोजन केले.

ऋचा पोंक्षे, रश्मी पांढरे, दीपाली जोशी, मधुवंती रानडे, ज्योती ढमाले, अनघा बुरसे, सुप्रिया खानोलकर, राखी भालेराव, शुभांगी देशपांडे, लीना परगी, पांडुरंग देशमुख, किसन शिंदे, माधव मराठे, रामचंद्र रानडे, श्रीपाद बुरसे, आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.