Pune : पुणे-अहमदनगर रोडवर टँकर उलटल्याने ज्वलनशील, विषारी वायूची गळती

एमपीसी न्यूज : आज पहाटे पुणे-अहमदनगर महामार्गावरील (Pune) वडगाव शेरी चौकाजवळ गॅस वाहून नेणाऱ्या टँकरला अचानक अपघात झाला. अत्यंत ज्वलनशील आणि विषारी इथिलीन ऑक्साईडची गळती झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पुण्यातील अग्निशमन दल आणि पोलिसांनी मोठ्या आपत्कालीन परिस्थितीला प्रतिसाद दिला.

पुणे अग्निशमन दलाच्या अधिका-यांनी सांगितले की, सोमवारी एका खाजगी क्षेत्रातील केमिकल कंपनीच्या टँकरमधून इथिलीन ऑक्साईड या अत्यंत ज्वलनशील, विषारी आणि कार्सिनोजेनिक रसायनाची गळती झाल्याचा फोन आला.

प्रथमदर्शनी टँकर रिलायन्स पेट्रोकेमिकल्सद्वारे चालवला जातो आणि आम्ही कंपनीच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. आमच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्यानंतर टँकरच्या टेंडरमधून ज्या ठिकाणाहून गळती होत आहे त्या ठिकाणी सतत (Pune) पाण्याची फवारणी सुरू करण्यात आली.

Talegaon : ‘प्रियभाई एक कविता हवीय’……अप्रतिम सादरीकरणाने तळेगावकर रसिक भारावले

कंपनीचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. परंतु त्यांची रासायनिक आणीबाणी प्रतिसाद वाहने सकाळी 8 च्या सुमारास पोहोचणे अपेक्षित आहे. तोपर्यंत आम्ही पाण्याची फवारणी करत राहू.” अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

स्थानिक पोलीस आणि वाहतूक नियंत्रण शाखा घटनास्थळी दाखल झाले आहेत. पुणे अहमदनगर रस्त्यावरील वाहतूक वळवली असून तसेच या भागाला जोडणारे काही रस्तेही वळवण्यात आले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.