Maval – मावळ व चिंचवडमधील कलाकारांनी साकारला लघुपट ‘मराठा तितुका मिळवावा’

एमपीसी न्यूज – मावळ व चिंचवडमधील कलाकारांनी मिळून (Maval) दिवाळीमध्ये मराठा तितुका मिळवावा या लघुपटाची निर्मिती केली. हा लघुपट यूट्यूबवर प्रदर्शित करण्यात आला आहे.

दिवाळीतील फटक्यांचा आवाज ऐकून सुभेदार तानाजी मालुसरे व मावळा यांना स्वराज्याची आठवण होते आणि शिवरायांच्या परवानगीने स्वराज्यात फेरफटका मारायला येतात, परंतु ज्या मावळ्यांनी मराठा म्हणजे अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदार यांचे स्वराज्य उभे केले आज तेच त्यांना दिसेनासे झाले. त्यांना परप्रांतीय लोक भेटतात.

पुन्हा गडावर गेल्यावर छत्रपती शिवराय व सुभेदार तानाजी मालुसरे यांच्यातील संवाद हा विचार करायला लावतो. एकूणच मराठी राज्यात मराठी माणूस कुठे गेला, व्यापार, उद्योग, व्यवसाय यातून हद्दपार झालं की काय अशी अवस्था आहे, याकडे लघुपटाच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात आले आहे.

सर्व स्थानिक कलाकारांनी उत्तम अभिनय केला आहे. जय श्रीराम (Maval) प्रॉडक्शन व वडगाव मावळचे तुषार वसंतराव वहिले (9637323323) यांनी कथा लेखन व दिग्दर्शन केले आहे. व छत्रपती शिवराय साकारले तसेच देहू येथील निवृत्त सेना अधिकारी उदयसिंग परदेशी यांनी तानाजीराव व चिंचवड येथील महेश गावडे यांनी मावळा, विजया पाटील हिने माँसाहेब जिजाऊ साकारल्या आहेत. रश्मी साळुंके, रफिक मुलाणी यांनीही या लघुपटात भूमिका केल्या आहेत.

Pune : पुणे-अहमदनगर रोडवर टँकर उलटल्याने ज्वलनशील, विषारी वायूची गळती

मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी या लघुपटाच्या पोस्टरचे अनावरण केले. यूट्यूबवर jayshriramprodution या चॅनलवर हा लघुपट प्रदर्शित करण्यात आला आहे. अनेकांनी या पहिल्याच प्रयोगाला छान प्रतिक्रिया दिल्या व शुभेच्छा दिल्या.

भविष्यात मराठी चित्रपट साकारणार असल्याची माहिती तुषार वहिले व उदयसिंग परदेशी यांनी दिली.

संपूर्ण लघुपट पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा –

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.