Pimpri corona Update : शहरात 997 जण कोरोनाचे सक्रिय रुग्ण; आज 132 नवीन रुग्णांची भर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात सध्या कोरोनाचे 997 रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. आज (मंगळवारी, दि. 8) शहरात 132 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात 151 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात कोरोनाबाधितांची आजवरची संख्या 93 हजार 647 एवढी झाली आहे. तर आजवर 89 हजार 898 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मंगळवारी सहा रुग्णांचा मृत्यू झाला. यातील तीन रुग्ण पालिका हद्दीतील आहेत. तर तीन रुग्ण हद्दीच्या बाहेरील आहेत.

शहरातील रुग्णांमध्ये संत तुकाराम नगर पिंपरी (57 वर्ष), दापोडी (50 वर्ष) येथील दोन पुरुष तर काळेवाडी (55 वर्ष) येथील एका महिलेचा समावेश आहे. शहराच्या बाहेरील रुग्णांमध्ये हडपसर (75 वर्ष), जुन्नर (80 वर्ष), धोलवड (62 वर्ष) येथील तीन पुरुषांचा आज मृत्यू झाला.

आजवर कोरोनामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील 1 हजार 671 तर शहराच्या बाहेरील 688 रुग्णांचा शहरातील रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

शहरात 927 रुग्ण सक्रिय आहेत. त्यांच्यावर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. तर 1 हजार 151 जणांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. शहरातील 122 रुग्णांवर शहराच्या बाहेरील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 822 जणांचे चाचणी अहवाल प्रतीक्षेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.