Pune : सुपरवायझरचा चाकूने भोकसून खून करत मृतदेह दिला पाचव्या मजल्यावरून फेकून

एमपीसी न्यूज –  इमारतीच्या बांधकाम साईटवर सुपरवायझरचा ( Pune) चाकूने भोसकून खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह पाचव्या मजल्यावरून डक्टमध्ये फेकून दिल्याची घटना बुधवारी कोंढवा एन आयबीएम अॅनेक्स परिसरात घडली.

पंकज कुमार मोती कश्यप (वय 35, सध्या रा. कृष्णानगर, महम्मदवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज कुमार मूळचा उत्तर प्रदेशातील आहे. तो सध्या एन आयबीएम अॅनेक्स येथील एका इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी सुपरवायझर म्हणून काम करीत होता.

Pune : पीएमपी बसमध्ये चढताना चाकात पाय अडकून झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू

मंगळवारी रात्री मित्रांसमवेत पाचव्या मजल्यावर दारू पिताना त्यांच्यात वाद झाला. त्यावेळी आरोपींनी त्याला चाकूने भोसकून जखमी केले. त्यानंतर त्याला पाचव्या मजल्यावरून खाली फेकून दिल्याचा संशय आहे.

पंकज कुमार तिसऱ्या मजल्यावर डक्टमध्ये अडकला. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी बुधवारी दुपारी तेथील कामगारांना पंकज कुमारचा मृतदेह आढळून आला. ही बाब पोलिसांना कळविण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला. मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविला आहे. कोंढवा पोलिस आरोपींचा शोध घेत ( Pune) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.