YCMH : वायसीएममध्ये अतिदक्षता प्रवेशद्वारातून गंभीर रुग्णांनाच प्रवेश

एमपीसी  न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात मुख्य ( YCMH) णारी गैरसोय तसेच आपत्कालीन विभागाकडून जाताना होणारी गर्दी यामुळे टळणार आहे. अतिदक्षता विभागाच्या बाजूने फक्त अतिगंभीर रुग्णांसाठीच प्रवेश दिला जाणार आहे.

Pune : सुपरवायझरचा चाकूने भोकसून खून करत मृतदेह दिला पाचव्या मजल्यावरून फेकून

वायसीएम रुग्णालयात केस पेपर काढण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारातून जावे लागते. हे प्रवेशद्वार सकाळी सहा ते साडेनऊ वाजेपर्यंत सुरू होते. रुग्णालयातील कर्मचारी कामावर रुजू झाल्यानंतर हे प्रवेशद्वार बंद केले जात होते. त्यानंतर अतिदक्षता विभागाच्या बाजूने असलेल्या प्रवेशद्वारातून आत जावे लागत होते. त्यामुळे अतिगंभीर रुग्णांची आणि इतर उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची व त्यांच्या नातेवाइकांची गर्दी होत असे. त्याचा रुग्णसेवेवर परिणाम होत होता. त्यावर उपाय म्हणून मुख्य प्रवेशद्वार साडेनऊनंतर सुरूच ठेवण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनाने घेतला आहे.

याबरोबरच जन्म आणि मृत्यूच्या दाखल्यांचे वाटप करण्यासाठी वायसीएममध्ये पाच खिडक्यांची सुविधा आहे. दुपारी एक वाजेपर्यंत दाखल्यांचे वाटप करण्यात येत होते. त्या वेळेमध्ये देखील वाढ करण्यात येणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले ( YCMH)  आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.