Sant Tukaram Maharaj : संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यासाठी पीएमपीकडून 125 जादा गाड्या

एमपीसी न्यूज – संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त ( Sant Tukaram Maharaj) पीएमटी कडून 125 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सात डेपो मधून देहूगावासाठी बस सोडल्या जाणार आहेत.
स्वारगेट, मनपा भवन, आळंदी, पुणे स्टेशन, निगडी, हडपसर या डेपो मधून ज्यादा बस सोडल्या जाणार आहेत. पीएमपी कडून देहूगावसाठी दररोज 25 बस सोडण्यात येतात. तर तुकाराम बीज निमित्त 125 ज्यादा बस सोडल्या जाणार आहेत. ज्यादा बस आणि प्रवाशांची संख्या लक्षात घेता देहूगाव येथे दोन बस स्थानक उभे करण्यात आले आहेत.

झेंडे मळ्याजवळील मिलिटरीच्या मोकळ्या जागेत पीएमपी कडून तात्पुरते बस स्थानक उभे करण्यात आले आहे. देहूगाव व आळंदी दर्शनाला जाण्यासाठी देहू आळंदी रस्त्यावर गाथा परिसरातील जगद्गुरु संत तुकाराम महाराज क्रीडांगणा जवळील ( Sant Tukaram Maharaj)   मैदानातून काही बस सोडल्या जाणार आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.