Nigdi : जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज – जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची जयंती (Nigdi) भक्ती-शक्ती समुह शिल्प येथे उत्साहात साजरी करण्यात आली. लहू लांडगे यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज यांच्या शिल्पास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

संत तुकाराम महाराजांनी समाजातील अनिष्ट रूढी परंपरा अंधश्रद्धा विरोधात अभंगातून कीर्तनातून आवाज उठवला. आजही त्यांच्या अभंगातून अंधश्रद्धा अनिष्ट रूढी परंपरा विरोधात लढण्याची प्रेरणा मिळते असे प्रतिपादन माजी नगरसेवक ह.भ.प.जयंत आप्पा बागल यांनी याप्रसंगी व्यक्त केले. माजी नगरसेवक सचिन चिखले म्हणाले की पुढील वर्षापासून संत तुकाराम महाराज यांची जयंती महोत्सव मोठ्या प्रमाणात तीन दिवस साजरा केला जाईल. प्रबोधन पर्वच्या माध्यमातून संत तुकाराम महाराजांचे विचार जनतेत रुजवून जनतेचे प्रबोधन मोठ्या प्रमाणात केले जातील.

तसेच मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रकाश जाधव यांनी आजही तुकोबाराय कुठल्यातरी रूपाने कुठेतरी जीवंतच आहेत,ते तुम्हाला देहूत भेटणार नाहीत वा मंदिरातही भेटणार नाहीत.जिथं अन्याय,अनीती,व्यभिचार, भ्रष्टाचार,अनैतिकता (Nigdi) असते. तिथं उशीरा का होईना ते विद्रोह घेवूनच जन्माला येतात.अन् प्रस्थापितांच्या विरुद्ध विद्रोह करून समतेसाठी लढा उभारतात असे म्हटले.

याप्रसंगी ह‌.भ.प.तानाजी काळभोर,ह.भ. प.देवराम कोठारे महाराज,ह.भ.प.अनिल सावंत महाराज,भारत विठ्ठलदास,शरद थोरात,कल्पना गीड्डे,यांनी मनोगते व्यक्त केली. संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे, जिजाऊ ब्रिगेडच्या माणिक शिंदे, राष्ट्रवादीच्या सपना शिंदे,मोनल शिंत्रे,रोहिदास शिवणकर,वसंत पाटील,शशिकांत आवटी, अभिषेक म्हसे यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते,सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार,छावा मराठा युवा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष धनाजी येळकर पाटील, प्रदेश उपाध्यक्ष संजय जाधव, विठ्ठलराव गायकवाड,सुनीता शिंदे,श्रीराम नलावडे,कालिदास कटाळे,शरद आवटे उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक नकुल भोईर यांनी केले सूत्रसंचालन निरंजनसिंह सोखी यांनी केले तर आभार वैभव जाधव यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.