Chakan : पोलीस असल्याची बतावणी करून ज्येष्ठ नागरिकाचे दागिने लुबाडले

एमपीसी न्यूज – पोलीस असल्याची बतावणी (Chakan) करत दोघांनी एका 71 वर्षीय नागरिकाचे 55 हजार रुपयांचे दागिने लुबाडले आहेत. ही घटना तळेगाव-चाकण रोडवर भिसे वृद्धाश्रम जवळ गुरुवारी (दि.1) सायंकाळी घडली.

यावरून तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात मोहन परशुराम बेद्रीकर (वय 71 रा. तळेगाव दाभाडे) यांनी फिर्याद दिली आहे. यावरून दोन अज्ञात इसमावर गुन्हा दाखल केला आहे.

Nigdi : जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भिसे वृद्धाश्रमाच्या गेट जवळून पायी जात होते. यावेळी आरोपी तेथे आले व त्यांनी पोलीस असल्याचे फिर्यादी यांना सांगितले. यावेळी त्यांनी फिर्यादी त्यांच्याकडून 45 हजार रुपयांचे 2 तोळे वजनाची चैन, 10 हजार रुपयांची अंगठी असा एकूण 55 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने काढून घेतले. यावरून तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.