Wakad : पार्ट टाईम जॉबचे आमिष दाखवून तरुणाची 30 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – पार्ट टाईम जॉबचे आमिष दाखवून तरुणाची 30 लाख रुपयाची (Wakad) फसवणूक कऱण्यात आली आहे. ही फसवणूक 24 जानेवारी ते 30 जानेवारी या कालावधीत कस्पटेवस्ती, वाकड येथे ऑनलाईन पद्धतीने घडली.

याप्रकरणी 39 वर्षीय तरुणाने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून 9769558116 या मोबाईल क्रमांक धारकावर तसेच विविध बँक खातेधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना त्यांच्या व्हॉटसअपवर आरोपीने पार्ट टाईम जॉबचे आमिष दाखवले. यासाठी एका टेलीग्राम वर विविध टास्क देऊन ते टास्क पुर्ण कऱण्यास सांगून त्यांनी कमावलेले पैसे हे वेळोवेळी विविध अकाउंटवर पाठवायला सांगून (Wakad) फिर्यादी यांची 30 लाख 20 हजार 370 रुपयांची फसवणूक केली आहे. यावरून वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.