BJP : कसबा मतदार संघाच्या वतीने भाजपाचे गाव चलो अभियान कार्यशाळा संपन्न

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पार्टी कसबा मतदार संघाच्या वतीने (BJP) निवडणूक प्रमुख हेमंत भाऊ रासने यांच्या नेतृत्वाखाली गाव चलो अभियान कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाला शहराध्यक्ष धीरज घाटे, अभियान प्रमुख रवींद्र साळेगावकर, प्रशांत हरसुले, लोकसभा प्रभारी श्रीनाथ भिमाले, सह प्रभारी राजेश येनपुरे, लोकसभा सहसंयोजक दीपक पोटे, पुणे शहर सरचिटणीस राघवेंद्र बापू मानकर, ओबीसी पुणे शहर अध्यक्ष नामदेव माळवदे, मतदारसंघ अध्यक्ष राजेंद्र काकडे उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे संयोजक अमित कंक, निलेश कदम, राजू परदेशी, पालक मामा देशमुख, छगन बुलाके, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित कंक यानी केले. तर, आभार निलेश कदम यांनी मानले.

Wakad : पार्ट टाईम जॉबचे आमिष दाखवून तरुणाची 30 लाखांची फसवणूक

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे गाव चलो अभियान (BJP) महत्वपूर्ण असल्याचा सूर व्यक्त करण्यात आला. भाजपने निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर लोकसभा निवडणूक होणार आहे. कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.