Nigdi : शस्त्राने वार करून चालकाला लुटणाऱ्या आरोपीला अटक

एमपीसी न्यूज – शस्त्राने वार करून एका चालकाला लुटण्यात आले आहे. ही घटना (  Nigdi) शनिवारी (दि.20) निगडी येथील भक्ती-शक्ती ब्रिज खाली घडली आहे. याप्रकरणी निगडी पोलिसांनी एकाला अठक केली आहे.

शब्बीर अत्तर सय्यद (वय 27 रा. ओटास्कीम, निगडी) असे अटक आरोपीचे नाव आहे. तर त्याच्या आणखी एका साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी रमेश बबन सुळे (वय 39 रा.तळवडे) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Ravet : आमच्याकडे का बघून हसतोय म्हणत तरुणावर कोयत्याने वार, दोघांना अटक

पोलिसांनी दिलल्या माहितीनुसार,  फिर्यादी हे त्यांचा पार्क केलेला टेम्पो घेण्यासाठी गेले असता तेथे रिक्षामध्ये बसलेले आरोपींनी फिर्यादीला थांबवले व त्यांच्या कडील हत्याराने फिर्यादीच्या डोळ्यावर मारून त्यांना जखमी केले. त्यांच्याकडील मोबाईल व रोख 4 हजार 500 रुपये असा एकूण 14 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. यावरून निगडी पोलिसांनी एकाला अटक केली असून दुसऱ्याचा पोलीस शोध घेत (  Nigdi) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.